घरी बसून राहण्यापेक्षा घेतला निर्णय, 60 वर्षीय आजीचा ज्वारीपासून प्रिमिक्स व्यवसाय, कमाई लाखात
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
हा व्यवसाय सुरू करून 8 महिने झाले असून दीड लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. पाहुयात आजींचा ज्वारीपासून सुरू केलेल्या व्यवसायाची यशोगाथा.
सोलापूर : घरी बसून राहण्यापेक्षा काहीतरी काम करावं म्हणून 60 वर्षीय आजींनी ज्वारीपासून प्रिमिक्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. रोहिणी रमेश कुलकर्णी वय 60 राहणार मंगळवेढा असे व्यवसाय सुरू केलेल्या आजीचे नाव आहे. हा व्यवसाय सुरू करून 8 महिने झाले असून दीड लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. पाहुयात आजींचा ज्वारीपासून सुरू केलेल्या व्यवसायाची यशोगाथा.
मंगळवेढा तालुक्यात राहणाऱ्या रोहिणी कुलकर्णी हे माजी शिक्षक असून घरी बसून कंटाळलेले होते. घरी बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा स्थानिक ज्वारीचा वापर करून काही नवीन करावे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी ज्वारीच्या पिठापासून विविध प्रकारचे प्रिमिक्स उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.
ज्वारीपासून त्यांनी इडली प्रिमिक्स, ज्वारी हेल्थ ड्रिंक प्रिमिक्स, मालदांडी ज्वारी रवा, ज्वारी ढोकळा प्रिमिक्स बनवले आहे. 50 रुपये पासून ते 300 किलो पर्यंतचे पाकीट विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर एकदा पॅकिंग केलेल्या या प्रिमिक्सची वैधता तीन महिन्यापर्यंत टिकून राहते.
advertisement
ज्वारीपासून बनवलेले प्रिमिक्स आरोग्यदायी, स्वस्त आणि स्थानिक चवीला मानणारे असल्याने ग्राहकांची पसंती वाढत आहे. मंगळवेढा तालुक्यातून सुरू केलेला हा लहानसा व्यवसाय आज पुणे, मुंबई, हैदराबाद, कर्नाटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांना प्रिमिक्स कुरियर द्वारे पाठवण्यात येत आहे.
80 हजार रुपये खर्च करून 8 महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या व्यवसायातून खर्च वजा करून दीड लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. मंगळवेढा तालुक्यातील हे यश स्थानिक उद्योजकतेला चालना देणारे आहे. रोहिणी आजींच्या या यशामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक व्यवसायाकडे वळण्यास प्रोत्साहित होत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 3:15 PM IST
मराठी बातम्या/मनी/
घरी बसून राहण्यापेक्षा घेतला निर्णय, 60 वर्षीय आजीचा ज्वारीपासून प्रिमिक्स व्यवसाय, कमाई लाखात








