पुणे : राज्यात अल्पवयीन मुला मुलीवरील अत्याचारांच्या घटना वारंवार समोर येत असतात. अशीच एक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना पुण्यात घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवत संशयिताने मुलीवर वारंवार अत्याचार करुन मुलीला गर्भवती बनवले. एवढच नाही तर 15 वर्षीय मुलीची घरातच प्रसूती नाळही स्वतः कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली असून मुलीला फूस लावून गर्भवती करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
advertisement
पुणे शहरातील नाना पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडील आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने घरात एकटी असताना स्वतःची प्रसूती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नाचं अमिष दाखवून या अल्पवयीन मुलशी संबंध करणाऱ्या आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला आरोपीने नऊ महिन्यांपूर्वी एक इंजेक्शन दिल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.
आरोपीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आईने दुसरे लग्न केले. ही मुलगी आणि तिचा भाऊ नाना पेठेत आत्याच्या घरी राहत होती. घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर जात असल्याने ती बहुतेक वेळा घरी एकटीच असायची. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही संबंध ठेवल्यामुळे आरोपीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
1 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 वर्षीय मुलाने लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर जबरदरदस्तीने वारंवार अत्याचार करत तिला गर्भवती केले आणि त्यांना एक मुल देखील झाले आहे. ज्यावेळी मुलीची मोठी बहीण घरी भेटण्यासाठी गेली त्यावेळी दरवाजा बंद होता. दरवाजा सुरुवातीला उघडला गेला नाही, ज्यावेळी ते आत आले त्यावेळी त्यांना घरात मोठ्या प्रमाणात रक्त दिसले, ते पाहून मुलीची बहीण घाबरली. त्यानंर लहान मुलासह मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. मुलगी आणि नवजात बाळ दोघांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपीची चौकशी सुरू
आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नसला तरी त्याने या अगोदर अशा प्रकारे कोणावर अत्याचार केले आहेत का, या अनुशंगाने सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.
