असा रचला पलायनाचा कट
शैलेश मोहिते याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि पोक्सो (Pocso) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी त्याने कोठडीत अंथरण्यासाठी चादर हवी असल्याचा बहाणा केला. पोलिसांचे लक्ष विचलित होताच, त्याने कोठडीतील स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचा सरकवल्या आणि तिथून बाहेर उडी मारून पळ काढला.
advertisement
पोलिसांची 'ॲक्शन मोड'मध्ये कारवाई
आरोपी पसार झाल्याचे लक्षात येताच येरवडा पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांनी तातडीने वायरलेसवर संदेश देऊन नाकाबंदी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोहितेला पोलिसांनी चहूबाजूंनी वेढा घालून अवघ्या ३ तासांच्या आत पुन्हा बेड्या ठोकल्या.
कोठडीतून पळ काढल्याप्रकरणी त्याच्यावर आता अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
