TRENDING:

मॅरेज लाईफ एंजॉय करायचंय, मुलाचं नंतर बघू! तुमचाही हाच विचार असेल तर आधी हा Video पाहाच

Last Updated:

Pregnancy Tips: महिलांचे वय वाढत असताना प्रजनन क्षमता कमी होते, त्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : असं म्हणतात की आई होणं जगातील सगळ्यात सुंदर सुख आहे. सध्या गर्भधारणा किंवा आई होण्याचे जे वय आहे ते दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामागे विविध कारणे आहेत. पण जर वयाच्या पस्तीशीनंतर आई व्हायचं असेल तर आई आणि बाळाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. पूजा कोहकडे यांनी माहिती दिलीये.
advertisement

सध्या महिलांमध्ये आई होण्याचे वय वाढत चालले आहे. यामागे विविध कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे करिअर होय. आम्हाला अजून आमचं मॅरेज लाईफ चांगल्या प्रकारे एन्जॉय करायचे आहे, लवकर मूल नकोय, अशी विविध कारणे आहेत. पण ही जरी कारणे असली तरी देखील महिलांनी लवकर आई होण्याचा निर्णय घ्यावा, असे डॉक्टर सांगतात.

advertisement

Skin Care Tips : त्वचेच्या प्रत्येक समस्येवर रामबाण आहे 'हे' फळ; चेहरा बनवते स्वच्छ, तेजस्वी आणि डागरहित!

‎महिलांचे वय वाढत असताना प्रजनन क्षमता कमी होते, त्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण होते. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना तरुण स्त्रियांच्या तुलनेत गर्भवती होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आणि प्रजनन उपचारांचा विचार करणे शहाणपणाचे ठरू शकते.

advertisement

तिशीनंतर गर्भधारणेसाठी अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता देखील कमी होते. वयस्कर महिलांमध्ये मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता सर्वसामान्य महिलांच्या तुलनेने अधिक असते, त्यामुळे कमी वजनाची बाळे जन्माला येतात. तसेच अकाली बाळ जन्मण्याची शक्यता असते, ज्यामुळे बाळाला दीर्घकाळ एनआयसीयूची आवश्यकता भासू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मॅरेज लाईफ एंजॉय करायचंय, मुलाचं नंतर बघू! तुमचाही हाच विचार असेल तर हा Video
सर्व पहा

‎उशिराने होणाऱ्या गर्भधारणेदरम्यान काही आरोग्य परिस्थितींचा धोका वाढतो. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना त्यांच्या गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि बाळाला डाउन सिंड्रोम सारख्या गुणसूत्रातील विकृती होण्याची शक्यता जास्त असते. या जोखमींविषयी प्रजनन तज्ज्ञांशी चर्चा करणे आणि गर्भधारणेपूर्वी आई आणि बाळाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी योग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मॅरेज लाईफ एंजॉय करायचंय, मुलाचं नंतर बघू! तुमचाही हाच विचार असेल तर आधी हा Video पाहाच
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल