नव्या मार्गिकांमुळे काय बदलणार?
लोकलच्या फेऱ्यांत मोठी वाढ: सध्या पुणे-लोणावळा दरम्यान केवळ दोनच मार्गिका असल्याने एक्सप्रेस आणि लोकल एकाच मार्गावरून धावतात. नव्या लाईन्समुळे लोकलसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल, ज्यामुळे दर १५-२० मिनिटांनी लोकल सोडणे शक्य होईल.
वेळेची मोठी बचत: एक्सप्रेस गाड्यांना रस्ता देण्यासाठी अनेकदा लोकल गाड्या आऊटरला थांबवून ठेवल्या जातात. नवीन मार्गिकांमुळे हा खोळंबा थांबेल आणि नोकरदार, विद्यार्थी तसेच पर्यटकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.
advertisement
वेगवान प्रवास: दोन अतिरिक्त ट्रॅक उपलब्ध झाल्यामुळे गाड्यांचा वेग वाढवता येईल, ज्यामुळे पुणे ते लोणावळा हे अंतर सध्याच्या तुलनेत कमी वेळात कापता येईल.
एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुधारणार: लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या नवीन ट्रॅकचा फायदा मिळेल, ज्यामुळे गाड्या उशिराने धावण्याचे प्रमाण कमी होईल.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघटना या नवीन लाईन्सची मागणी करत आहेत. हा प्रकल्प राज्य सरकार आणि रेल्वे यांच्या भागीदारीतून पूर्ण केला जाणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन हा सर्वात मोठा टप्पा होता, ज्यावर आता तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. या नवीन रेल्वे लाईन्स कार्यान्वित झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणार असून, लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता रेल्वेच्या महसुलातही मोठी वाढ होणार आहे.
