TRENDING:

Pune News: खाकीला काळिमा! बुधवार पेठेतील 'त्या' तरुणीचं धक्कादायक गुपित लपवणं भोवलं; महिला पोलिसाचं निलंबन

Last Updated:

२०२३ मध्ये एका दलालामार्फत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीला बुधवार पेठेत आणण्यात आले होते. तिथे तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई करण्याऐवजी, तिची माहिती लपवून भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारणाऱ्या महिला पोलीस हवालदारावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील महिला हवालदार मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
त्या तरुणीचं सत्य लपवणं भोवलं (प्रतिकात्मक फोटो)
त्या तरुणीचं सत्य लपवणं भोवलं (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकं प्रकरण काय?

२०२३ मध्ये एका दलालामार्फत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीला बुधवार पेठेत आणण्यात आले होते. तिथे तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आले. या गंभीर प्रकरणाची माहिती हवालदार मनीषा पुकाळे यांना मिळाली होती, इतकेच नव्हे तर संबंधित मुलीनं त्यांची भेटही घेतली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असतानाही, पुकाळे यांनी ही माहिती वरिष्ठांपासून लपवून ठेवली.

advertisement

पैसे घेतल्याचा गंभीर आरोप

निलंबनाच्या कारवाईमागे केवळ माहिती लपवणे हेच एकमेव कारण नसून, संबंधित तरुणीकडून पुकाळे यांनी पैसे घेतल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. कायद्याचे रक्षण करण्याऐवजी गुन्हेगारी स्वरूपाच्या माहितीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पोलीस दलात खळबळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

संबंधित बांगलादेशी तरुणीने नुकतीच फरासखाना पोलिसात फिर्याद दिल्यानंतर दलाल आणि कुंटणखाना मालकासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या तपासादरम्यान पुकाळे यांचा हलगर्जीपणा आणि संशयास्पद भूमिका समोर आली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि गुन्हेगारांना पाठिशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दमच या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: खाकीला काळिमा! बुधवार पेठेतील 'त्या' तरुणीचं धक्कादायक गुपित लपवणं भोवलं; महिला पोलिसाचं निलंबन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल