हे मंदिर चमोली जिल्ह्यातील देवाल ब्लॉकमधील 'वाण' नावाच्या एका छोट्या गावात आहे. हे गाव नंदा देवी राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. हा परिसर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे लाटू देवता मंदिर या परिसराला आणखी खास बनवतं.
सामान्य लोकांना प्रवेश का नाही?
लाटू देवता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात कोणत्याही भक्ताला प्रवेश मिळत नाही. वर्षातून फक्त एकदाच पुजारी गाभाऱ्यात जातात, तेही डोळ्यांवर पट्टी बांधून आणि तोंडावर कापड बांधून! ही परंपरा अनेक शतकांपासून चालत आली आहे आणि यामागची श्रद्धा खूपच रहस्यमय आहे. असं म्हणतात की, या मंदिरात नागराज आपल्या मण्यासोबत विराजमान आहेत. या मण्याचा प्रकाश इतका तेजस्वी आहे की, जर कुणाची नजर त्यावर पडली, तर तो आंधळा होऊ शकतो. म्हणूनच, सामान्य लोकांना तर प्रवेश वर्ज्य आहेच, पण पुजारीसुद्धा डोळे आणि तोंड पूर्णपणे झाकूनच पूजा करतात, जेणेकरून प्रकाशाची किरणे डोळ्यांपर्यंत पोहोचू नयेत आणि नागराजाला कुठल्याही वासाचा त्रास होऊ नये.
advertisement
कधी उघडतात मंदिराचे दरवाजे?
या मंदिराचे दरवाजे इतर मंदिरांप्रमाणे दररोज उघडत नाहीत. लाटू देवता मंदिराचे दरवाजे फक्त वैशाख महिन्यातील पौर्णिमेला उघडले जातात. या दिवशी दूरदूरून भक्त मंदिराच्या आवारात येतात आणि बाहेरूनच दर्शन घेऊन पुण्य कमावतात. हा दिवस परिसरातील लोकांसाठी एका उत्सवापेक्षा कमी नसतो.
कोण आहेत लाटू देवता?
चमोलीचे रहिवासी कैलाश वशिष्ठ सांगतात की, पौराणिक मान्यतेनुसार, लाटू देवता हे उत्तराखंडची पूजनीय देवी नंदाचे भाऊ आहेत. देवी नंदा (जी पार्वती मातेचं रूप मानली जाते) यांच्या लग्नावेळी, लाटू देवता त्यांना निरोप देण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते. प्रवासात त्यांना तहान लागली आणि त्यांनी एका झोपडीत ठेवलेल्या दोन घागरींमधून चुकून मद्य प्राशन केले. यानंतर ते संतप्त झाले आणि गोंधळ घालू लागले, यामुळे नंदा देवी क्रोधित झाल्या आणि त्यांनी त्यांना शाप देऊन वाण गावात बंदिस्त राहण्याचा आदेश दिला. नंतर लाटूंनी आपली चूक मान्य केली आणि पश्चाताप केला. यानंतर आईने त्यांना वचन दिलं की, त्यांची पूजा वाण गावात केली जाईल, पण या अटीवर की, त्यांना कुणीही थेट पाहू शकणार नाही.
भक्ती आणि रहस्याची गुंफण
लाटू देवता मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि रहस्याचं एक अद्भुत मिश्रण आहे. फक्त स्थानिकच नव्हे, तर दूरदूरून येणारे भक्तही या अलौकिक परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी येथे येतात. मंदिराभोवतीचं वातावरण खूप शांत, आध्यात्मिक आणि रोमांचक आहे. उत्तराखंडमधील अनेक मंदिरे त्यांच्या अनोख्या परंपरा आणि श्रद्धेसाठी ओळखली जातात, पण लाटू मंदिरासारखी रहस्यमय ठिकाणं खूप कमी आहेत.
हे ही वाचा : Astrology : बुध ग्रह 6 जूनला करतोय राशीबदल; 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार, होणार मालामाल!
हे ही वाचा : खर्च नाही, पूजा नाही... फक्त 1 फोटो दूर करते तुमच्या घरातील वास्तुदोष; जाणून घ्या फोटोमागचे अद्भुत रहस्य!