TRENDING:

या जन्मतारखेच्या व्यक्तींनी वाहन जपून चालवा, अपघात होण्याची शक्यता

Last Updated:

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 जुलै 2024चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नंबर 1 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

श्री गणेश सांगतात, दिवस अनुकूल आहे. विचारपूर्वक केलेली कामं पूर्ण होतील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. हट्टीपणाने निर्णय घेणं टाळा. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्रास होईल.

नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

श्री गणेश सांगतात, दिवस तणाव वाढवणारा असेल. पैसे गुंतवणं टाळा. पैसे अडकण्याची शक्यता जास्त आहे. एखादी हुशार व्यक्ती त्याच्या बोलण्यातून तुम्हाला अडकवू शकते. आईचं आरोग्य थोडं बिघडू शकतं. तुमचा रक्तदाब थोडा वाढू शकतो. श्री शंकराची आराधना केल्यास मन शांत राहील.

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

श्री गणेश सांगतात, नेहमीपेक्षा जास्त पैसे खर्च कराल. घरात दिवसभर तणावाचं वातावरण असेल. घरी गुरूंचं नामस्मरण केलं, तर तुमचा त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. श्वसनासंबंधी समस्या जाणवू शकते.

जेवल्यानंतर ताटात हात धुणे योग्य की अयोग्य? वास्तुशास्त्र काय सांगते

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

श्री गणेश सांगतात, नशिबाची साथ मिळेल. मन जागरूक ठेवून विचार कराल. ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्याबाबत अतिविचार टाळा. कारण तुम्हाला त्यासाठी जाणीवपूर्वक मेहनत करावी लागणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

advertisement

श्री गणेश सांगतात, तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक होईल. तुमचं नियोजन आणि वास्तव यात थोडा फरक असेल. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यावसायिक नवीन आणि चांगला मार्ग शोधतील. काळजीपूर्वक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमची मुलं एखादं कौतुकास्पद कार्य करू शकतात.

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

श्री गणेश सांगतात, तुम्ही तुमच्या खासगी आयुष्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एखादा संसर्गजन्य आजार त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांशी संपर्क साधून लगेच उपचार सुरू करा. प्रेमप्रकरणापासून दूर राहा अन्यथा तुमचा मानसिक ताण आणि घरातल्या समस्या वाढतील.

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

श्री गणेश सांगतात, आरोग्याबाबत चिंता सतावू शकते. मेंदू किंवा पायाच्या समस्येमुळे त्रस्त राहाल. धार्मिक प्रवृत्तीमुळे तुमचं मन सुरळीत कार्यरत राहील. तुमच्या मुलाच्या वर्तनामुळे तुम्हाला खूप वाईट वाटेल. प्रभू श्रीरामांची सेवा केल्यास संकटातून बाहेर पडाल.

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

श्री गणेश सांगतात, दिवस त्रास आणि तणाव वाढवणारा आहे. तुमचे निर्णय तुम्हाला चुकीचे सिद्ध करतील. प्रत्येक कामात अडथळ्याचा सामना करावा लागेल. चालू असलेलं काम बिघडू शकतं. कोणी तरी तुमच्याकडून पैसे घेईल आणि नंतर परत करायचं विसरून जाईल. त्यामुळे कोणालाही पैसे देणं टाळा. वाहन जपून चालवा. कारण अपघात होण्याची शक्यता आहे.

Sleeping Position: तुमच्या झोपण्याच्या या 5 पोझिशन्सवरून जाणून घ्या तुमचा स्वभाव

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

श्री गणेश सांगतात, तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. घरी किंवा कामाच्या ठिकाणी विजेच्या उपकरणांची काळजी घ्या. तुमची विचारपूर्वक आखलेली धोरणं अयशस्वी ठरतील. त्यामुळे तुमचा संताप होईल. रागवल्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.

मराठी बातम्या/अध्यात्म/
या जन्मतारखेच्या व्यक्तींनी वाहन जपून चालवा, अपघात होण्याची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल