मेष (Aries) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्या लव्ह लाइफसाठी उत्तम आहे. तुम्ही आज प्रेमाचा आनंद घ्याल. जोडीदारासोबत संवाद सुधारेल. तुम्ही तुमचा प्लॅन जोडीदाराशी शेअर करू शकता. आर्थिक बाबतीत परिस्थिती मजबूत राहील. तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. तुम्हाला आनंद मिळेल. आज एखाद्या गोष्टीवर ठाम राहत पुढे जा, फायद्याचं ठरेल. कुटुंबासाठी दिवस आनंदात जाईल. तुम्हाला राग अनावर होऊ शकतो, अशा परिस्थितीत सावध राहा. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.
advertisement
Lucky Colour : White
Lucky Number : 11
वृषभ (Taurus) : श्री गणेश सांगतात, आज तुम्ही घरगुती कामात व्यग्र राहाल. कुटुंबासोबत वेळ गेल्यानं मानसिक तणाव दूर राहील. मनामध्ये समाधान आणि आनंदाची भावना राहील. कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक स्थळी भेट देऊ शकता, त्यासाठी ही योग्य वेळ आहे. ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या कष्टाचं फळ मिळेल. आरोग्य चांगलं राहील. आर्थिक बाबतीत पैशांची गुंतवणूक करण्यास दिवस अनुकूल नसल्यानं पैसे गुंतवणं टाळा. मित्रांसह आनंदात दिवस जाईल. आज वैयक्तिक जीवन समाधानकारक राहील.
Lucky Colour : Orange
Lucky Number : 8
Sleeping Position: तुमच्या झोपण्याच्या या 5 पोझिशन्सवरून जाणून घ्या तुमचा स्वभाव
मिथुन (Gemini) : श्री गणेश सांगतात, आज तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाला योग्य गती द्याल. आर्थिक बाबतीत अचानक लाभ होऊ शकतो. सरकारी योजनेचादेखील लाभ मिळेल. तुमचं आरोग्य चांगलं राहील. विवाहित व्यक्तींसाठी दिवस चांगला जाईल. आज तुमच्या जोडीदाराच्या आवडीचा स्वयंपाक करा, फायद्याचं ठरेल. खर्चात वाढ होईल.
Lucky Colour : Maroon
Lucky Number : 9
कर्क (Cancer) : श्री गणेश सांगतात, आज तुमचा खर्च जास्त होईल; पण त्या तुलनेत उत्पन्न मिळणार नाही. अशा परिस्थितीत खर्चाचा बोजा जास्त होणार नाही, याची काळजी घ्या. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. तुम्हाला मदत करण्याचाही प्रयत्न करेल. प्रेमाच्या बाबतीत तुमच्या प्रियकराशी तुमचं नातं बिघडू शकते, काळजी घ्या. नातेसंबंधांसाठी हा काळ कमकुवत आहे, सावधगिरी बाळगा, अन्यथा नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात, काळजी घ्या. कामाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेचा फायदा घ्याल. त्यासाठी ही योग्य वेळ आहे.
Lucky Colour : Red
Lucky Number : 12
सिंह (Leo) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्या व्यवसायासाठी खूप अनुकूल आहे. तुम्ही यशस्वी व्हाल. नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. विवाहित व्यक्तींचं कौटुंबिक जीवन समाधानी राहतील. तुमच्या जोडीदारासाठी मनापासून काही करण्याचा प्रयत्न करा, फायद्याचं ठरेल. लव्ह लाइफसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. प्रियकराशी जवळीक वाढेल. आजचा दिवस तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल; मात्र आज कोणाशीही संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घ्या.
Lucky Colour : Yellow
Lucky Number : 2
कन्या (Virgo) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे; पण गुंतवणूक विचारपूर्वक करा. आज तुमचा खर्च वाढेल; मात्र उत्पन्नात फारशी वाढ होणार नाही, काळजी घ्या. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यानं प्रभावित होऊन पैसे गुंतवू नका. ऑफिसमध्ये काम करताना तुमचे कष्ट दिसून येतील. तुम्हाला कष्टाचं फळ मिळेल. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. जोडीदारासोबत जवळीक निर्माण होईल. आज तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेमाच्या बाबतीत दिवस आनंदात जाईल.
Lucky Colour : Green
Lucky Number : 4
तूळ (Libra) : श्री गणेश सांगतात, आज तुमचं उत्पन्न चांगलं राहील. बऱ्याच दिवसांपासूनच्या इच्छा पूर्ण होतील. खूप दिवसांपासून प्रलंबित असणारं काम पूर्ण होईल. त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमचं आरोग्य चांगलं राहील. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. अन्यथा पोट खराब होऊ शकते. वैवाहिक जीवनात तणाव राहील. जोडीदार तुमच्यावर रागवू शकतो. रागाच्या भरात तुमच्यासोबत चुकीचं बोलू शकतो. सावधगिरी बाळगा. प्रेमाच्या बाबतीत आज जोडीदारासाठी काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न कराल.
Lucky Colour : Navy Blue
Lucky Number : 17
वृश्चिक (Scorpio) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुम्हाला अपार आनंद देणारा असेल. तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष दिल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतील. नोकरदार व्यक्ती त्यांच्या कामात व्यग्र राहतील. दिवस आर्थिकदृष्ट्या मजबूत राहील. खर्च कमी होईल. आज आळस करू नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवनात समृद्धी येईल.
Lucky Colour : Sky Blue
Lucky Number : 16
धनू (Sagittarius) : श्री गणेश सांगतात, आज तुमचं एखादं काम नशीबानं पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला चांगला लाभ होईल. तुमच्या स्वभावात चढ-उतार येतील. कधी तुम्ही खूप आनंदी असाल, तर कधी खूप राग येईल. हे टाळण्याचा प्रयत्न करा, फायद्याचं ठरेल. कारण यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. कुटुंबासाठी दिवस आनंदात जाईल. कुटुंबात एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची तयारी करू शकता. कौटुंबिक जीवन सर्वसाधारण राहील. लव्ह लाइफमध्ये समस्या येऊ शकतात, काळजी घ्या.
Lucky Colour : Brown
Lucky Number : 3
मकर (Capricorn) : श्री गणेश सांगतात, आज कुठेही पैसे गुंतवू नका, नुकसान होऊ शकतं. अनोळखी व्यक्तीच्या प्रभावाने कोठेही पैसे गुंतवू नका. विवाहित व्यक्तींसाठी घरगुती जीवनात खूप आनंदी असेल. जोडीदार तुमच्यावर प्रेम करील. लव्ह लाइफमध्ये आज हुकूमशाही दिसून येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी खूप काही करण्यास उत्सुक असाल. जोडीदारासोबत वेळ जाईल. खर्च वाढेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल.
Lucky Colour : Pink
Lucky Number : 6
कुंभ (Aquarius) : श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमचा खर्च कमी होईल. व्यवसायात यश मिळेल. चांगला नफा मिळेल. ऑफिसमध्ये काम करताना बॉसशी चांगली चर्चा होईल. तुमचा बॉस तुम्हाला काही कामात मदतही करेल. घरातलं वातावरण थोडं अशांत असू शकते, काळजी घ्या. विवाहितांसाठी दिवस आनंदात जाईल. मानसिक शांती मिळेल. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. जोडीदारावर प्रेम करा.
Lucky Colour : Red
Lucky Number : 7
जेवल्यानंतर ताटात हात धुणे योग्य की अयोग्य? वास्तुशास्त्र काय सांगते
मीन (Pisces) : श्री गणेश सांगतात, आज तुम्ही कोणताही खर्च करू नका अन्यथा तुमच्यासाठी समस्या निर्माण होतील. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न सामान्य असेल. नोकरदारांनी ऑफिसमध्ये काम करताना कोणाशीही भांडण होणार नाही, याची काळजी घ्यावी. कारण आजची परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल नाही. वैवाहिक जीवनात प्रेम असेल. लव्ह लाइफमध्ये जोडीदारासोबत तणाव वाढेल. जोडीदाराला पटवून देण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा. आरोग्य चांगलं राहील.
Lucky Colour : Dark Green
Lucky Number : 11
