TRENDING:

सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद, समोर आलं कारण, कधीपासून सुरू होणार?

Last Updated:

सिद्धिविनायक गणपती मंदिरात दरवर्षी माघ श्रीगणेश जयंतीपूर्वी "श्रीं" चे सिंदूर लेपन केले जाते. यावर्षीही सिंदूर लेपन करण्यात येणार असून दूर लेपनाच्या कालावधीत भाविकांना गणपती बाप्पाच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
News18
News18
advertisement

मुंबई : प्रभादेवीमधील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात. या मंदिरात दरवर्षी माघ श्रीगणेश जयंतीपूर्वी "श्रीं" चे सिंदूर लेपन केले जाते. यावर्षीही सिंदूर लेपन करण्यात येणार असून दूर लेपनाच्या कालावधीत भाविकांना गणपती बाप्पाच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे बुधवारपासून 5 दिवस सिद्धिविनायक दर्शन बद राहणार आहे.

advertisement

बुधवार, दिनांक 11 डिसेंबर 2024 ते रविवार, दिनांक 15 डिसेंबर 2024 या कालावधीत श्री सिद्धिविनायकाचे सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना गाभाऱ्या बाहेरून श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन दिले जाईल. या कालावधीत मंदिरातील सर्व नित्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेवर केले जाणार आहेत. त्यामुळे भाविकांनी या काळात मंदिरात येताना या सगळ्या सूचना पाहूनच दर्शनासाठी यावे.

advertisement

शेतकऱ्यांनी जगायचं कसं? सरकारच्या कुचकामी धोरणामुळे ‘पांढरं सोनं’ अडकलं

सोमवार, दिनांक 16 डिसेंबर 2024 या दिवशी गाभाऱ्यामध्ये स्थलशुद्धी प्रीत्यर्थ उदकशांत आणि प्रोक्षण विधी हा धार्मिक विधी होईल. त्यानंतर श्रींची महापूजा, नैवद्य आणि आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजल्या पासून भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन दिले जाईल.

तसेच श्रीमारुतीचे देखील प्रतिवर्षाप्रमाणे सिंदूर लेपन करण्यात येते. त्यामुळे या कालावधीत श्रीमारुतीचे दर्शन बंद राहील. सोमवार दिनांक 16 डिसेंबर पासून श्रीमारुतीवर संक्षिप्त चालन विधी करून पहाटे भाविकांना श्रीमारुतीचे दर्शन चालू होईल. त्यानंतर भाविक श्री मारुतीचे दर्शन घेऊ शकतील.

advertisement

प्रभादेवी मधील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास याठिकाणी श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दररोज अनेक भाविक येतात. आल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणूनच येणाऱ्या सगळ्या भाविकांनी या सूचनांचे पालन करावे अशी विनंती मंदिरातल्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांना केली आहे.

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद, समोर आलं कारण, कधीपासून सुरू होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल