TRENDING:

पुणेकरांची नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

Last Updated:

सरत्या वर्षाला निरोप देत आज नवीन वर्षाची सुरुवात होत असून, नवीन संकल्प, आशा घेत नागरिक हे देवदर्शनाला जात असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देत आज नवीन वर्षाची सुरुवात होत असून, नवीन संकल्प, आशा घेत नागरिक हे देवदर्शनाला जात असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नववर्षानिमित्त मंदिराला देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

advertisement

फक्त पुणे नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातील नागरिक देखील दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. त्यामुळे मंदिर परिसर हा भक्तिमय झालेला पाहिला मिळत आहे. मंदिर परिसरात होत असलेली गर्दी पाहता वाहनांना देखील बंदी घालण्यात आली. जवळपास एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांग लागलेली पाहिला मिळत आहे.

पुण्याच्या निकिताची कमाल, रॅली चॅम्पियनशिप जिंकणारी पहिलीच युवती स्पर्धक

advertisement

View More

'प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो आणि नवीन वर्षाची सुरुवात ही दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनानी करतो. सर्व जगाला सुख समृद्धी, यश, आरोग्य मिळो अशी देवाकडे प्रार्थना जी आहे ती केली आहे. आम्ही अक्कलकोटवरून इथे दर्शनासाठी आलो आहोत. हे सगळं वातावरण बघता छान वाटतं आहे', असं भाविकाने सांगितले. 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 50 वर्षांनंतर ‘शोले’चं रिलीज, चित्रपटातील सीन पाहून संभाजीनगरकर म्हणाले...
सर्व पहा

'दर्शनाला खूप गर्दी आहे. एवढी गर्दी होईल अशी अपेक्षा नव्हती. ढोलताशाचां गजर आणि भक्तिमय वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत हे केलं जात आहे. यामुळे मनात छान भावना आहेत', अश्या भावनाही काही भाविकांनी व्यक्त केल्या आहेत.

मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
पुणेकरांची नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल