मंदिराचा इतिहास आणि धार्मिक श्रद्धेबाबत पंडित भुवनेश्वर भट्ट यांनी सांगितले की, श्री तिळभांडेश्वर महादेव मंदिर शहराच्या मध्यभागी आहे. हे शहर अस्तित्वातही नव्हते तेव्हापासून स्वयंप्रकाशित शिवलिंग येथे आहे, मंदिराच्या पुरातनतेचा अंदाज यावरून लावू शकता. शिवलिंगावर 24 तास जल अर्पण केलं जातं. कोणत्याही स्थितीत शिवलिंगावरील जलधार थांबवली जात नाही. बारा महिने चोवीस तास हे शिवलिंग जलधारी जलमग्न असते.
advertisement
कोणत्या राशींसाठी कोणती रत्ने असतात शुभ; धारण करण्यापूर्वी या गोष्टी पाहून घ्या
पंडितजी पुढे सांगतात की, ही आमची 11वी पिढी महादेवाची सेवा करत आहे. आमचे पूर्वज सांगतात की, देवाधिदेव महादेव जेव्हा येथे शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले तेव्हा ते लहान रूपात होते. तेव्हापासून दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी भोलेनाथ पिंढीला तिळाच्या आकारात वाढवत राहतात. महादेवाचा हा चमत्कार त्याच्या येथील भक्तांसाठी विशेष आहे.
या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगती ठरलेली! पण, प्रेमात नसते इमोशनल अटॅचमेंट
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
