धाराशिव: निसर्गाचं विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या बालाघाट डोंगर रांगांच्या कुशीत श्री रामलिंग हे देवस्थान आहे. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. वास्तूशिल्पाचा अप्रतिम अविष्कार असणाऱ्या या मंदिरात शिवभक्तांची नेहमीच गर्दी असते. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. रामलिंग या ठिकाणाबाबत रामायण काळातील एक आख्यायिका असून याबाबत रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत सस्ते यांनी माहिती दिलीये.
advertisement
जटायू-रावण युद्ध
रामायण काळात सीता मातेला घेऊन जाणाऱ्या रावणाला जटायू पक्षाने आडवले. रामलिंग या ठिकाणी जटायू आणि रावणात घणघोर युद्ध झाले. यामध्ये जटायू जखमी झाला. परंतु, श्रीराम सीतामातेच्या शोधात त्या ठिकाणी आले असता त्यांना जखमी जटायू दिसला. जटायूने प्रभू रामाला याचठिकाणी सर्व घटनाक्रम सांगितला. रामाने जखमी जयाटूला पाणी पाजण्यासाठी एक बाण मारला आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली. पुढे जटायूचा मृत्यू झाला आणि त्याच्यावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले. त्या ठिकाणी जटायूची समाधीही आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.
तब्बल 20 वर्षांची परंपरा, पुण्यात साजरी केली पुस्तकांची दहीहंडी, नेमका काय आहे हा उपक्रम?, VIDEO
प्रभू रामाने स्थापन केले शिवलिंग
प्रभू राम सीतेच्या शोधात याठिकाणी आले असता त्यांना शिवाची आराधना करायची होती. तेव्हा त्यांनी एक शिवलिंग स्थापन केले. त्यांच्यासोबत वानरसेनाही होती. हेच शिवलिंग रामलिंग म्हणून ओळखले जाते, अशीही एक आख्यायिका सांगितली जाते. सध्याही या परिसरात मोठ्या प्रमाणात वानरांचं वास्तव्य आहे.
समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर, पावसाळी पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाण, Photos
निसर्गसंपन्न रामलिंग
रामलिंग परिसर हा अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात पशु-पक्ष्यांचा मोठा वावर आहे. वनविभागाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही केली आहे. येथील पुरातन शिवमंदिरासोबतच येथील धबधबा आणि समृद्ध निसर्ग हेही पर्यटकांचं आकर्षण आहे. त्यामुळे धार्मिक आणि निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक याठिकाणी येतात.