असा सांगितला जातो इतिहास
खरंतर मंदिर परिसरला पोद्दार बगीचा नावाने ओळख आहे. अंदाजे 100 वर्ष पेक्षाही आधी एकदा याठिकाणी राहणाऱ्या पोद्दार यांनी परिसरतीलच एका मंदिरातील मूर्ती तिच्या पायाचा शेंदूर निघाल्याने या बगिच्यात आणून ठेवली होती. त्यानंतर जवळच असलेल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून या मूर्तीची पूजा होऊ लागली. तेव्हा छोटंसं मंदिर बनवलं होतं. कालांतराने या मूर्तीच्या जागी मंदिरात दुसरी मूर्ती स्थापित करण्यात आली. तेव्हापासून याच मूर्तीची पूजा मंदिरात केली जात आहे, असे महाराज सांगतात.
advertisement
विदर्भातील या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास, योगी आदित्यनाथांशी आहे खास कनेक्शन
दुर्गा देवीची स्थापना
शास्त्री चौकात पूर्वी केवळ हनुमानाचे मंदिर होते. या मंदिराचे सर्वात पहिले महंत विजयनाथजी महाराज यांच्या कार्यकाळात दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून हे मंदिर श्री हनुमान दुर्गा माता मंदिर या नावाने ओळखले जाते, अशी माहिती महंत मुकेशनाथ महाराज यांनी दिलीय. त्यानंतर आणखी काही वर्षांनी मंदिरात विकास होऊन राधा कृष्ण, 12 जोतिर्लिंग, शिव दरबार, लक्ष्मी, सरस्वती, गणपती, राम लक्ष्मण सीता, या मूर्तीही स्थापन करण्यात आल्या आहेत. नवरात्रीत शेकडो घट आणि अखंड ज्योती यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे.
अनेक भाविकांचे श्रद्धास्थान
वर्ध्यातील हनुमान दुर्गामाता मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतरही राज्यातील भाविक येतात. अखंड ज्योत घटस्थापनेसाठी नोंदणी करतात. अनेक भक्त याठिकाणी रोज दर्शनासाठी येतात. मंदिर सकाळी 6 वाजेपसून रात्री 9:30 वाजेपर्यंत सुरू असते. सकाळी साडेसात आणि सायंकाळी साडेसात वाजता दोन आरत्या होतात, असेही महाराजांनी सांगितले.