22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. या क्षणाचे साक्षीदार म्हणून प्रत्येक घराला निमंत्रण म्हणून तांदूळ पाठवण्यात आले होते. त्यावेळी राम मंदिराकडून आलेल्या तांदळाचे काय करायचे, असा संभ्रम बहुतेकांच्या मनात होता. याविषयी ज्योतिषी डॉ. गौरव दीक्षित यांनी अधिक माहिती दिली आहे.
अक्षताचे निमंत्रण ही जुनी परंपरा -
advertisement
डॉ.गौरव दीक्षित यांच्या मते, भारतीय परंपरेनुसार, प्राचीन काळी लोक कोणत्याही सण किंवा कार्यक्रमासाठी एकमेकांना आमंत्रण देण्यासाठी अक्षतांचा वापर करत. लोकांना अक्षत म्हणजेच तांदूळ देऊन आमंत्रणे पाठवली जात. यासाठी हळदी-कुंकवाने रंगवलेला लाल-पिवळा तांदूळ वापरण्यात यायचा. हिंदू धर्मात अक्षताला विशेष स्थान आहे आणि कोणतीही पूजा, विधी किंवा धार्मिक कार्य अक्षतांशिवाय पूर्ण होत नाही.
जय जय श्रीराम..! आज राम नवमी, रवि योगात पूजा, पहा विधी, मंत्र आणि शुभ मुहूर्त
नवमीला अक्षतांनी श्री रामाचा टिळक -
ज्योतिषी गौरव दीक्षित यांच्या मते, रामललाच्या प्राण प्रतिष्ठापणेसाठी आमंत्रण म्हणून मिळालेला तांदूळ अतिशय शुभ मानला जातो. या अक्षता कपाळावर लावून टिळक करणे खूप शुभ मानले जाते. ज्या लोकांच्या घरी आजही अयोध्येचा तांदूळ आहे. ते लोक नवमीला त्या अक्षताने रामललाचा टिळक करू शकतात. असे केल्याने तुम्हाला भगवान श्रीरामाचा आशीर्वाद मिळेल. तसेच कोणत्याही कामात अडचणी येणार नाहीत. याशिवाय कोणत्याही शुभ कार्यासाठी जाताना तुम्ही या अक्षतांनी टिळक औक्षण करून निघू शकता.
राम नवमीला मुलगा झाला तर? श्री रामावरून ही 6 खास नावं ठेवू शकता
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)