TRENDING:

VIDEO : 'सिक्स मारायची तुझ्यात ताकद नाहीये, तु फक्त सिंगल...', बाबरला लय बेक्कार ट्रोलं केलं, LIVE मॅचमध्ये फजिती झाली

Last Updated:

बाबर आझमला खूप घाणेरड्या पद्धतीने ट्रोल सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mohammad Kaif Roasted Babar Azam : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा तीन विकेट पराभव केला होता. खरं तर या सामन्यात नेदरलँडने पाकिस्तानच्या नाकात दम आणला होता. सामन्यात एक वेळ असे वाटत होतं की पाकिस्तान हारते की काय? पण फहीम अश्रमच्या खेळीने पाकिस्तानने सामना जिंकला.पण ज्या खेळाडूमुळे हा सामना इतका अटीतटीचा झाला त्या बाबर आझमला खूप घाणेरड्या पद्धतीने ट्रोल सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
babar azam trolled
babar azam trolled
advertisement

खरं तर त्याच झालं असं की पाकिस्तानच्या डावाची सूरूवात खूप चांगली होती. साहिबजादा फरहानने 47 धावा आणि सायम अयुबने 24 धावांची खेळी केली होती. हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर कॅप्टन सलमान आघा आणि बाबर आझम मैदानात आले होते. यावेळी बाबर खूपच स्लो खेळत होता.ज्यामुळे पाकिस्तानच्या डावाची धावगती खूपच कमी होत चालली होती.

advertisement

advertisement

पाकिस्तानने 18 बॉलमध्ये 15 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीत एक चौकार आणि उरलेल्या 11 धावा त्याने सिंगल काढल्या होत्या. त्यामुळे बाबरची ही संथ खेळी पाहून कॉमेन्टेटर्सनी तर त्याची इज्जतच काढायला सूरूवात केली.पाकिस्तानचा कॉमेंटेटर म्हणत होता बाबर आझमने सिक्स मारण्याची गरज आहे. कॉमेंटेटरच्या या विधानानंतर बाबरने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला.पण बॉल सीमारेषापार गेलाच नाही आणि बाबर कॅच आऊट होऊन बसला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी भांडवलात सुरू करा तेल घाणा व्यवसाय, मिळेल नफाच नफा, संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

बाबर कॅच आऊट होताच भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याची खिल्लीच उडवली. बाबर फक्त बॅटींग करतो, आता तुम्ही बोललात ना सिक्स मार,कुठे मारू शकला तो फिल्डर मागे आहे.त्याच्यात सिक्स मारायची ताकद नाही आहे, तो फक्त सिंगल डबल धावा घेऊ शकतो, अशा शब्दात कैफने बाबरला ट्रोल केलं. कैफनंतर दुसरा कॉमेन्टेटर म्हणाला, जिकडे मोठा शॉर्ट मारायला गेला तिकडे आऊट झाला.पण ठीक आहे तू वेळ घे पण सामना तरी संपवं,अशा शब्दाच त्याने देखील बाबरच्या खेळीवर टीका केली.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 'सिक्स मारायची तुझ्यात ताकद नाहीये, तु फक्त सिंगल...', बाबरला लय बेक्कार ट्रोलं केलं, LIVE मॅचमध्ये फजिती झाली
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल