रोहित अन् विराटचं काय होणार?
टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यावर लगेचच, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांच्यात एक बैठक होणार आहे. विशाखापट्टणम येथील तिसऱ्या वनडे सामन्यानंतर बीसीसीआयचे उच्च अधिकारी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हे अहमदाबादमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे. रोहित आणि कोहली यांना त्यांच्या पुढील भूमिकेबद्दल स्पष्टता देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते कोणत्याही अनिश्चिततेशिवाय खेळू शकतील, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलंय.
advertisement
गंभीरच्या हातात रो-कोचा निर्णय
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हे दोघंही मिटिंगला असल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रोहित अन् विराटला कसोटी क्रिकेटमधून बाहेर काढल्यानंतर आता वनडे क्रिकेटमधून देखील डच्चू देणार की काय? असा सवाल चाहते विचारत आहेत. त्यामुळे गंभीर आणि आगरकर यांच्यावर टीका होताना दिसत आहे.
फिटनेस आणि कामगिरीवर लक्ष
सध्या हे दोन्ही खेळाडू फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळत असल्यामुळे, त्यांना दीर्घ विश्रांतीनंतर फॉर्ममध्ये परतण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही चिंता संघ व्यवस्थापनाला सतावत आहे. यामुळे, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त विजय हजारे करंडक यांसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्याचा सल्ला दिला जाणार आहे. तसेच, बीसीसीआयने रोहितला त्याच्या भविष्याबद्दलच्या चर्चांकडे दुर्लक्ष करून केवळ आपल्या फिटनेस आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. रोहितने चॅम्पियन्स करंडकापर्यंत ज्या आक्रमक शैलीत फलंदाजी केली होती, तीच कायम ठेवावी अशी अपेक्षा संघ व्यवस्थापनाला आहे.
