TRENDING:

T20 World Cup मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट! जय शहांनी पाकिस्तानला गुघड्यावर आणलं, 15 तारखेच्या मॅचवर PCB ची 'बॅक चॅनल' डिप्लोमसी

Last Updated:

India vs Pakistan, T20 World Cup : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांनी 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Biggest Twist T20 World Cup : यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मोठमोठाले ड्रामा पहायला मिळाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅच होणार नाही, असं चित्र निर्माण झालं होतं. पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मजा राहिली नाही, असा सूर लावला जात होता. अशातच आता आयसीसीने पाकिस्तानच्या मुसक्या आवळ्यावर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून हलक्या आवाजात कजबुज सुरू झाली असून पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्यास मानसिक तयारी करत आहे.
T20 World Cup Pakistan start Critical Talks With ICC
T20 World Cup Pakistan start Critical Talks With ICC
advertisement

लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मॅच ही नेहमीच आयसीसीसाठी कमाईचे मोठे साधन राहिली आहे. मात्र, यावेळी या महामुकाबल्यावर वादाचे ढग जमा झाले असून ही मॅच होणार की नाही, याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. बांगलादेशला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ काहीशी माजली होती. अशातच पीसीबीने आयसीसीला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न केलाय.

advertisement

नियोजित पद्धतीने चर्चा सुरू

आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता हे प्रकरण संघर्षाकडे न नेता संवादाच्या माध्यमातून सोडवण्यावर भर दिला जात आहे. आयसीसीने पाकिस्तानला विचारलं आहे की, ही परिस्थिती टाळण्यासाठी त्यांनी स्वतःहून काय प्रयत्न केले आहेत. सध्या आयसीसी आणि पीसीबी यांच्यात नियोजित पद्धतीने चर्चा सुरू असून या वादातून मार्ग काढण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे, जेणेकरून चाहत्यांना ही हाय-व्होल्टेज मॅच बघायला मिळेल.

advertisement

आयसीसीची पीसीबीला ताकीदही 

आयसीसीने स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला ठणकावून सांगितले की, ही परिस्थिती कोणत्याही प्रकारे नैसर्गिक आपत्तीच्या श्रेणीत येत नाही. जर पाकिस्तान संघ मैदानात उतरला नाही, तर आयसीसी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई वसूल करेल, अशी कडक ताकीदही देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानची तंतरली असल्याचं पहायला मिळतंय.

'बॅक चॅनल' डिप्लोमसी

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, या आर्थिक कारवाईच्या भीतीपोटी आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे धाबे दणाणले असून त्यांनी आपली आक्रमक भूमिका थोडी मऊ केली आहे. आयसीसीकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर, पीसीबीने स्वतःहून जागतिक क्रिकेट संस्थेशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही मॅच न झाल्यास होणारे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आता दोन्ही बाजूंनी 'बॅक चॅनल' डिप्लोमसी आणि संवाद सुरू झाला असून एक सुवर्णमध्य काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट! जय शहांनी पाकिस्तानला गुघड्यावर आणलं, 15 तारखेच्या मॅचवर PCB ची 'बॅक चॅनल' डिप्लोमसी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल