या स्पर्धेच्या यशावर भर देण्यास उत्सुक असलेल्या आयसीसी बोर्डाने पुढचा वर्ल्ड कप 10 टीमसोबत खेळण्याला मान्यता दिली आहे, असं आयसीसीने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. 2025 चा महिला वर्ल्ड कप 10 टीममध्ये खेळवला गेला होता.
प्रेक्षकांच्या संख्येने विक्रम मोडले
महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये प्रेक्षक आणि प्रसारणामध्येही नवीन विक्रम प्रस्थापित झाले. स्पर्धेचं आयोजन भारत आणि श्रीलंकेमध्ये करण्यात आलं होतं. पाकिस्तानने त्यांचे सगळे सामने श्रीलंकेमध्ये खेळले. ग्रुप स्टेजलाच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आल्यामुळे वर्ल्ड कपची सेमी फायनल आणि फायनलही भारतात झाली.
advertisement
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वर्ल्ड कप फायनल जियो हॉटस्टारवर 18.5 कोटी प्रेक्षकांनी पाहिली, जी पुरुष टी-20 वर्ल्ड कप 2024 फायनलएवढीच होती. तर संपूर्ण स्पर्धा 44.6 कोटी लोकांनी पाहिली. फायनल मॅच एकाच वेळी 2.1 कोटी लोकांनी पाहिला.
