काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आयसीसी वर्ल्ड कपमध्ये महिला संघांनी वर्ल्ड कप जिंकला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंच्या सत्काराचा केला जाईल. यामध्ये स्मृती मानधना, राधा यादव आणि जेमिमा रॉड्रिक्स यांचा समावेश आहे. जेव्हा संपूर्ण टीम मुंबईत असेल तेव्हा राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण संघाचा सत्कार देखील केली जाईल. महिला खेळाडूंनी भारताची मान उंचावली आहे. महिला खेळाडूंना रोख पारितोषिक दिलं जाईल, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
advertisement
किती रोख पारितोषिक मिळणार?
महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंना किती रोख पारितोषिक दिलं जाईल? याची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर टीम इंडियाच्या मेन्स खेळाडूंचा देखील सत्कार राज्य सरकारने केला होता. यामध्ये रोहित शर्मा, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता.
रेणुका सिंग ठाकूरला 1 कोटी
दरम्यान, टीम इंडियाने रविवारी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर सोमवारी भल्या पहाटे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी टीम इंडियाची महिला क्रिकेटपटू रेणुका सिंग ठाकूर हीच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रेणुका ठाकुर हिच्याशी फोनवर चर्चा करून तिला 1 कोटी रूपये बक्षीस स्वरूपात देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर रेणुका ठाकूरला नोकरीची ऑफर दिली आहे.
