खरं तर महेंद्र सिंह धोनीने अद्याप तरी निवृत्तीचे कोणतेही संकेत दिलेले नाही आहेत. पण धोनी नंतर कोण असा प्रश्न चेन्नईला नेहमीच सतावतो.अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज वारसदारच्या शोधात निघाली आहे.त्यामुळे
चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला ताफ्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे.यासाठी चेन्नई त्यांच्या दोन खेळाडूंना राजस्थानला देण्याची ही तयारी दर्शवते आहे.
advertisement
चेन्नई सुपर किंग्ज संजू सॅमसनला संघात घेण्यास तयार आहे. यासाठी आयपीएलच्या ट्रान्सफर विंडोत चेन्नई रविचंद्रन अश्विन आणि शिवम दुबेला राजस्थान रॉयल्सला द्यायची तयारी करते आहे. पण यामध्ये रविचंद्रन अश्विनला 8.25 कोटींच्या अधिकृत रकमेच्या बदल्यात संजू सॅमसन सीएसकेमध्ये सामील होण्यास सज्ज आहे. त्यामुळे धोनीच्या लाडक्याचा बळी जाणार आहे.
विशेष म्हणजे शिवम दुबे कुठेही जाणार नाही आहे. चेन्नई सुपर किंग्ज त्याला कोणत्याही खेळाडूच्या बदल्यात देणार नाही आहे. त्यामुळे शिवम दुबे चेन्नईत राहणार आहे. आणि आजचा व्यवहार हा संजू सॅमसन आणि अश्विनमध्येच होता.त्यापेक्षा वेगळे काही घडले नाही आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
आता जर संजू सॅमसन संघात आता तर चेन्नई सुपर किंग्जला एक विकेटकिपर आणि कर्णधार देखील मिळणार आहे. आणि संजू सॅमसनची कामगिरी पाहता धोनीनंतर संघाचे नेतृत्व त्याच्या खांद्यावर दिले जाण्याचीही शक्यता आहे.