मला काही वाईट मित्रांचा नाद लागला.त्यामुळे क्रिकेटला खूप कमी वेळ द्यायला सूरूवात केली.त्यानंतक ज्या गरजेच्या गोष्टी नव्हत्या,त्याला जास्त महत्व द्यायला सूरूवात केली.त्यामुळे माझी प्रॅक्टीसही खराब झाली होती. कुठे मी 8 तास प्रॅक्टीस करायचो ते 4 तासांवर आलो होतो. माझ्या आयुष्यातला हा एक काळ होता,असे पृथ्वी शॉ सांगतो. पृथ्वी शॉ न्यूज 24 ला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत बोलत होता.
advertisement
चुकीच्या मित्रांमुळे मी वाईट मार्गाला लागलो. पण यात सर्वाधित चुक माझी होती. पण आता या गोष्टी राहिल्या नाहीयेत कारण मी आता स्वत:ला खूप स्ट्रॉग केलं आहे. मी आता एकटं राहायला सूरूवात केली आहे. तसेच ती लोक आता मला मैदानात पाहत नाही. ती भरकटणारी लोकं देखील माझ्यापासून दूर झाली आहे. त्यामुळे ते एकप्रकारे बरंच झालं, आपल्याआपचं रस्ता क्लिअर झाला आणि मला कळून चुकलं की आयुष्य कसं चालतं, असे पृथ्वी शॉ सांगतो.
दरम्यान पृथ्वी शॉ पुढे म्हणतो, माझ्या वडिलांनी या सर्वांत मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे पृथ्वी शॉ स्वत:च स्वत:ला त्या ठिकाणी आणू शकतो.त्यामुळे आता त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पृथ्वी शॉ सांगतो.