भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानच्या महिला संघाला भारताने 93 धावांवर ऑलआऊट केले होते. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकण्यासाठी 94 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या 10.1 ओव्हर म्हणजे 61 बॉलमध्ये हे लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे. भारताकडून व्रिंदा दिनेशने 29 बॉलमध्ये 55 धावांची नाबाद वादळी खेळी केली होती. तिला यावेळी अनुष्का शर्माने 24 आणि तेलज हसबनीसने 12 धावांची साथ दिली. या बळावर भारताने 10.1 ओव्हर मध्ये हा सामना 8 विकेट आणि 59 बॉल राखून जिंकला आहे.
advertisement
खरं तर भारत अ महिला संघ आणि पाकिस्तान अ महिला संघ यांच्यात हा सामना एसीसी वुमेन्स आशिया कप रायझिंग स्टार 2026 स्पर्धेत पार पडला होता. या स्पर्धेत पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना 93 धावांवर ऑलआऊट झाली होती. पाकिस्तानकडून शवाल झुल्फीकारने सर्वाधिक 23 धावा केल्या होत्या तिच्यासोबत गुल रूखने 21 धावांची खेळी केली होती बाकी इतर 8 खेळाडू एकेरी धावसंख्या करून बाद झाले होते.त्यामुळे पाकिस्तान 18.5 ओव्हरमध्ये 93 धावांवर ऑलआऊट झाली होती. भारताकडून यावेळी सायमा ठाकोर, कॅप्टन राधा यादव आणि प्रेमा रावतने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. जिंतीमानी कालिता आणि मिनु मानी प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
दरम्यान भारताच्या महिला संघाने 8 विकेट पाकिस्तानच्या महिला संघाला धूर चारल्यानंतर आता भारताचा पुरूष संघ वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला पराभूत करून दाखवतो का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. या सामन्याला आता थोड्याच वेळात सूरूवात होणार आहे. या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता आहे.
