TRENDING:

IND vs ENG U19 World Cup Final Live : भारताने वर्ल्ड कप विजयाचा सिक्सर मारला,आयुश म्हात्रेच्या टीमने देशाची मान उंचावली

Last Updated:

U19 Cricket World Cup Final IND Vs ENG Live Streaming : आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना 6 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेच्या हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून इंग्लंडने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs England U19 World Cup Final Live : नमस्कार! आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडे आता स्वत:ला वेगळ्या पातळीवर नेण्याची संधी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना आज शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जाणार आहे. तब्बल 28 वर्षाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या इंग्लंडला पाणी पाजून पुन्हा एकदा वर्ल्ड कप आपल्या नावावर करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. टीम इंडियाच्या कामगिरीवर सर्वांचं असेल. जाणून घ्या ताज्या अपडेट... इथेच! 
IND vs ENG U19 World Cup Final Live
IND vs ENG U19 World Cup Final Live
advertisement
Feb 06, 20268:35 PM IST

भारताने वर्ल्ड कप विजयाचा सिक्सर मारला

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 311 धावात ऑल आऊट करून सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्डकरवर नाव कोरले आहे. भारताने दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड 311 वर ऑल आऊट झाली त्यामुळे भारताने हा सामना 100 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने जिंकला आहे. भारताचा हा सहावा वर्ल्ड कप विजय ठरला आहे.
Feb 06, 20267:39 PM IST

इंग्लंडची शरणागती,टीम इंडिया वर्ल्ड कप विजयाच्या उंबरठ्यावर

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या 411 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव गडगडला आहे. इंग्लंडचे 7 खेळाडू तंबूत परतले आहेत.त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी आता अवघ्या तीन विकेटची आवश्यकता आहे.त्यामळे टीम इंडिया कोणत्याही क्षणी वर्ल्डकप जिंकण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा हा सहावा वर्ल्ड कप विजय असणार आहे.
Feb 06, 20265:57 PM IST

इंग्लंडला पहिला झटका

भारताने दिलेल्या 411 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची पहिली विकेट पडली आहे. टीम इंडियाचा गोलंदाज आर अम्ब्रीशने जोसेफ मुरसला बोल्ड केले आहे.जोसेफ 17 धावांवर खेळत होता. पण त्याची विकेट पडल्याने इंग्लंडला धक्का बसला आहे.
advertisement
Feb 06, 20265:09 PM IST

वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा धावांचा डोंगर

वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केला आहे. आयुश म्हात्रेच्या अर्धशतकीय आणि वैभव सूर्यवंशीच्या दीड शतकीय खेळीच्या बळावर भारताने 411 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 412 धावा कराव्या लागणार आहेत.
Feb 06, 20264:31 PM IST

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सूस्साट, साडे तीनशे धावांचा आकडा गाठला

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने साडे तीनशे धावांचा आकडा गाठला आहे. अभिग्नान कुंडू यावेळी 35 धावांवर खेळतो आहे. आणखी 6 ओव्हरचा खेळ बाकी आहे.त्यामुळे टीम इंडिया जवळपास 400 च्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.
Feb 06, 20262:41 PM IST

फायनलमध्ये वैभव सुर्यवंशीची वादळी सेंच्युरी, इंग्लंडविरुद्ध फक्त 55 बॉलमध्ये ठोकलं शतक!

टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध धमाकेदार शतक ठोकलं आहे. 8 फोर अन् 8 सिक्सच्या मदतीने वैभवने फक्त 55 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली.
advertisement
Feb 06, 20262:35 PM IST

टीम इंडियाला दुसरा धक्का

टीम इंडियाला दुसरा धक्का बसला असून कॅप्टन आयुष म्हात्रे 53 धावा करून बाद झाला. 51 बॉलमध्ये आयुषने 7 फोर अन् 2 सिक्सच्या मदतीने धावा कोरल्या.
Feb 06, 20262:33 PM IST

वैभव सूर्यवंशीचा धमाका

Feb 06, 20262:10 PM IST

टीम इंडियाचं शतक पूर्ण

टीम इंडियाचं शतक पूर्ण झालं आहे. 13.2 ओव्हरमध्ये भारताच्या 100 धावा पूर्ण झाल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 55 धावांचा वाटा आहे. भारताने आत्तापर्यंत फक्त 1 विकेट मगावलीये.
advertisement
Feb 06, 20261:59 PM IST

वैभव सूर्यवंशीचं फक्त 32 बॉलमध्ये अर्धशतक

वैभव सूर्यवंशीने फक्त 32 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं असून टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं आहे. 7 फोर अन् 3 सिक्सच्या मदतीने त्याने ही कामगिरी केलीय.
Feb 06, 20261:49 PM IST

10 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 79 धावा

पहिल्या 10 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 79 धावा केल्या आहेत. वैभव सूर्यवंशीने 42 धावांवर खेळत असून कॅप्टन आयुष म्हात्रे 26 धावांवर खेळतोय.
Feb 06, 20261:45 PM IST

6,4,4,4... वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या मिंटोला धुतलं!

6,4,4,4… टीम इंडियाच्या वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या मिंटोला धू धू धुतलं आहे. 9 व्या ओव्हरमध्ये 18 धावा काढल्या. एरॉनच्या विकेटनतर आता वैभवने गियर बदलले असून टीम इंडियाचं जोरदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
Feb 06, 20261:21 PM IST

सेमीफायनलचा शतकवीर एरॉन जॉर्ज आऊट

टीम इंडियाला पहिला धक्का बसला असून सेमीफायनलचा शतकवीर एरॉन जॉर्ज आऊट झाला आहे. प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आलेल्या ग्रीने त्याची विकेट काढली. पॉईंट्सच्या दिशेने त्याचा कॅच उडाला.
Feb 06, 20261:11 PM IST

एरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी यांची आक्रमक सुरूवात

एरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी यांनी फोर मारत आपापल्या डावाची सुरूवात केली. दोन ओव्हरमध्ये 10 धावा झाल्या आहेत.
Feb 06, 202612:44 PM IST

टॉस जिंकून काय म्हणाला कॅप्टन आयुष म्हात्रे?

आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पीच खूप चांगलं दिसत आहे, थोडं कडक आहे आणि आम्ही एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. सेमीफायनलचं पीच फलंदाजीसाठी खूपच चांगलं होतं, त्यामुळे मुलांनीही खूप चांगला खेळ केला आणि त्यांनी उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन केलं, जे आमच्यासाठी चांगले होतं. आम्ही फक्त आमचा नैसर्गिक खेळ खेळू आणि गोष्टी सोप्या ठेवू. गोष्टी गुंतागुंतीच्या न करता, फक्त आमचा क्रिकेट खेळू. आमच्या टीममध्ये कोणतीही बदल केले नाही.
advertisement
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG U19 World Cup Final Live : भारताने वर्ल्ड कप विजयाचा सिक्सर मारला,आयुश म्हात्रेच्या टीमने देशाची मान उंचावली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल