TRENDING:

SL vs IRE : N4, Wd, Wd, 6, 2,Wd, 2, W, W, Wd, 0....11 बॉलची एक ओव्हर, बॉलरने डोकंच पकडलं, मैदानात काय घडलं?

Last Updated:

आयरलँडकडून 19 वी ओव्हर घेऊन बॅरी मॅककार्थी मैदानात आला होता. यावेळी मॅककार्थीने 11 बॉलची ओव्हर टाकली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sri Lanka vs Ireland : आयसीसी टी20 वर्ल्डकमध्ये कोलंबोच्या मैदानात सूरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेने 163 धावा केल्या आहेत. त्यामुळे आयरलँड समोर 164 धावांचे लक्ष्य आहेत. या सामन्यात आयरलँडच्या एका बॉलरने 11 बॉलची एक ओव्हर टाकली होती. ही ओव्हर टी20 वर्ल्डकपमधली आतापर्यंत सर्वात महागडी ओव्हर ठरली आहे. त्यामुळे आयरलँडच्या या खेळाडूच्या नावावर आता नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
barry mccarthy bowled 11 deliveries
barry mccarthy bowled 11 deliveries
advertisement

आयरलँडकडून 19 वी ओव्हर घेऊन बॅरी मॅककार्थी मैदानात आला होता. यावेळी मॅककार्थीने 11 बॉलची ओव्हर टाकली.या ओव्हरमध्ये त्याने पहिलाच बॉल नो टाकला ज्यावर कामिंडू मेंडिसने चार धावा काढल्या होत्या. त्यानंतर मॅककार्थी सलग दोन वाईड टाकले.

चौथ्या बॉलवर त्याला सिक्स बसला त्यामुळे तो अधिकृत पहिला बॉल ठरला. पाचव्या बॉलवर म्हणजेच (अधिकृत दुसऱ्या बॉलवर)वर मेंडीसने 2 धावा काढल्या. त्यानंतर सहावा बॉलने त्याने पुन्हा एक वाईड टाकला. सातव्या बॉलवर (अधिकृत तिसऱ्या बॉलवर) त्याच्या दोन धावा आल्या. आठव्या बॉलवर (अधिकृत चौथ्या बॉलवर) मेंडीस आऊट झाला

advertisement

बॅरीच्या नवव्या बॉलला (अधिकृत पाचव्या बॉलवर) शनाका आऊट झाला. त्यानंतर बॅरीने दहावा बॉलही वाईड टाकला.आणि 11 बॉल त्याने व्यवस्थित टाकला त्यात एकही धाव काढता आली नाही. अशाप्रकारे या 11 बॉलमध्ये श्रीलंकेने 19 धावा काढल्या.

अर्शदिप सिंहचा नकोसा रेकॉर्ड मोडला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रविवारी मार्केट हाललं, आल्याची आवक वाढली, डाळिंब अन् केळीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

आयरलँडच्या बॅरीने अर्शदिप सिंहचा नकोसा रेकॉर्ड मोडला. अर्शदिपने 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये आयरलँड विरूद्ध 10 बॉलची सर्वाधिक मोठी ओव्हर टाकली होती.त्याच्यानंतर आता बॅरीने 11 बॉलची ओव्हर टाकून नकोसा विक्रम करून घेतला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SL vs IRE : N4, Wd, Wd, 6, 2,Wd, 2, W, W, Wd, 0....11 बॉलची एक ओव्हर, बॉलरने डोकंच पकडलं, मैदानात काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल