खरं तर या लीगमध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. गेल्या पाच सामन्यापैकी त्यांनी एक सामना जिंकला आहे आणि 4 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क आटोकाट प्रयत्न करत आहेत. यासाठी मुंबईने सीटल ऑरकसची संघाविरूद्ध 4 विकेट गमावून 237 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे मुंबई सहज जिंकेल असे वाटत होते.पण राजस्थानच्या खेळाडूने गेम फिरवला.
advertisement
मुंबईने दिलेल्या 237 धावांचा पाठलाग करताना सीटल ऑरकसची सुरूवात चांगली झाली नव्हती.पण आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेला आणि राजस्थान रॉयल्य संघाकडून खेळणाऱ्या सिटल ऑरकसच्या या खेळाडूच्या बॅट तळपली आणि सामन्याचा निकालच फिरला. शिमरन हेटमायरने एकट्या 97 धावांची सर्वांधिक खेळी करून संघाला हा सामना जिंकून दिला. विशेष म्हणजे या सामन्यात शेवटच्या बॉलवर 6 धावांची आवश्यकता होती. अशावेळेस हेटमायरने सिक्स मारू सिटल ऑरकसला सामना जिंकून दिला. अशाप्रकारे हेटमायरने हा सामना जिंकून दिला.
तर मुंबई इंडियन्स न्युयॉर्ककडून कर्णधार निकोलस पूरणने 108 धावांची शतकीय खेळी केली होती. आणि तजिंदर ढिल्लोणने 95 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्स न्युयॉर्कने 4 विकेट गमावून 237 धावा केल्या होत्या.इतकं भलं मोठं लक्ष ठेवून मुंबई जिंकेल असे वाटत होते. पण त्यांचा पराभव झाला.
या पराभवामुळे मुंबई दुसरा विजय मिळवण्यापासून वंचित राहिली.त्यामुळे आता मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिली आहे. मुंबईने सहा सामन्यात एक सामना जिंकला आहे, तर पाच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.मुंबईच्या खात्यात 2 गुण आहेत. तर मुंबई विरूद्ध जिंकणारी सिटल ऑरकस आपला पहिलाच सामना जिंकून पाचव्या स्थानी राहिली आहे.त्यामुळे सिटल ऑरकस आणि मुंबईचे समसमान गुण आहेत.