प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर विल जॅक्सने मोठं विधान केलं होतं. मला वाटतं संपूर्ण श्रेय नेपाळला जातं. ते खूपच हुशार होते. आम्ही फलंदाजी करताना हे अवघड होतं हे आम्हाला दिसलं, पण ते आमच्याविरुद्ध खूप चांगले खेळले आणि त्यांनी आम्हाला खूप जवळ आणले. ते खूप छान खेळले,असे विल जॅक्स म्हणाला होताय
advertisement
विल जॅक्स पुढे म्हणाला, मिडल ऑर्डरमध्ये वेळ घालवणे छान आहे. गेल्या महिनाभरात मी थोडा कमी पडलो.मध्यभागी असलेल्या खेळाडूंनी मला मैदान कसे असते ते सांगितले आहे, म्हणून फक्त चेंडू येऊ द्या, छान आणि ते करणे सोपे आहे.
हे अजिबात सोपे नव्हते, सुदैवाने आम्ही सामना जिंकलो. त्यांनी खूपच चांगला खेळ केला आणि फार कमी संघ आदिल रशीदला अशा प्रकारे खेळतात, जसे त्यांनी खेळले. मला वाटले की, तो स्कोअर वाचवण्यासाठी आम्ही खूप चांगल्या स्थितीत होतो. स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो,असे इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक म्हणाला.
कसा रंगला सामना
खरं तर इंग्लंडने नेपाल समोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपालचे कुशल भूरटेल आणि आसिफ शेखची सूरुवात खराब झाली होती. पण नेपालच्या फलंदाजांनी दुसऱ्याच ओव्हरमध्ये गिअर बदलत आक्रामक फलंदाजी केली. इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कुशल भूरटेलने तीन खणखणीत चौकार लगावले होते.त्यानंतर मार्क वुडला नेपाली बॅटसमनने धुतला होता. त्यामुळे दोन ओव्हरमध्ये नेपालने 29 धावा काढल्या होत्या. त्यानंतर आसिफ शेख 7 धावांवर बाद झाला होता. त्याच्या पाठोपाठ कुशल भुरटेलही 29 धावांवर आऊट झाला.
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित पोडेल आणि दिपेंद्र सिंह ऐरी फलंदाजी आले होते. या दोघांनी सूरूवातीला थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर गिअर बदलला होता. दोघांनी गिअर बदलल्यानंतर नेपाल 8 विकेट राखून अस जिंकेल असे वाटत होते. कारण या दोन्ही खेळाडूंनी नेपालचा डाव 100 च्या पाल नेला होता.त्यामुळे नेपाल संघाला जिंकण्याची आशा निर्माण झाली होती. पण तेवढ्यात दिपेंद्र सिंह 44 वर बाद झाला, त्याच्या पाठोपाठ रोहित पौडेल देखील 39 वर बाद झाला.त्यामुळे दोन्ही खेळाडू बाद झाल्याने नेपाल संकटाच सापडली होती. त्यानंतर आरिफ शेख मैदानात आला पण तो देखील 10 धावा देऊन बाद झाला.
त्याच्यानंतर लोकेश बामने शेवटच्या क्षणी 18 बॉलमध्ये 39 धावांची खेळी करून सामना फिरवण्याचा प्रयत्न केला होता.शेवटच्या ओव्हरला 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. पण लोकेश बामला फक्त 5 धावा काढता आल्याने नेपाळने हा सामना 4 धावांनी गमावला होता.
