वर्ल्ड कपमध्ये फॅक्चर बोटासह खेळली
फायनलमध्येही शेफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर टीमला मोठ्या फटक्यांची गरज असताना रिचा घोषने 24 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 34 रन केले. रिचा घोषने टीम इंडियासाठी संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये एक्स फॅक्टर ठरली. पण तुम्हाला माहितीये का? रिचा घोष वर्ल्ड कपमध्ये फॅक्चर झालेल्या बोटासह खेळत होती. एवढंच नाही तर विकेटकिपिंग देखील करत होती.
advertisement
धल्या बोटात हेअरलाइन फ्रॅक्चर
रिचाने तिच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटात हेअरलाइन फ्रॅक्चर असतानाही खेळणे सुरू ठेवले, अशी धक्कादायक माहिती गालचे जलद बॉलिंग कोच शिब शंकर पॉल यांनी दिली आहे. बोट तुटलेले असतानाही रिचाने मोठे सिक्स मारले, जे तिची इच्छाशक्ती दर्शवते. 'घाबरू नकोस. वेदना कमी होईल, पण वर्ल्ड कप आपल्या हातून जायला नको. टूर्नामेंट जिंकून परत ये, असं देखील आपण तिला सांगितलं होतं, असंही शिब शंकर पॉल यांनी म्हटलं आहे. 2022 चा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी मी गमावली आहे. यावेळी मला ती मिळवायची आहे, असा निश्चय रिचा घोषने केला होता.
133.52 च्या स्ट्राइक रेटने 235 रन
दरम्यान, या वर्ल्ड कपमध्ये रिचाने 8 इनिंग्जमध्ये 39.16 च्या एव्हरेजने 235 रन केले, तिचा स्ट्राइक रेट 133.52 होता, जो टूर्नामेंटमध्ये सर्वात जास्त होता. बंगालच्या या क्रिकेटरने सर्वाधिक 12 सिक्स मारले. ग्रुप स्टेजमधील साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्येही तिची हाय-इम्पॅक्ट गेमप्ले दिसली, जिथे तिने 11 फोर आणि 4 सिक्स मारत 77 बॉलमध्ये 94 रनची खेळी केली. वर्ल्ड कपवेळी रिचा घोष रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत बॅटिंगचा सराव करत होती आणि 'पॉवर-हिटिंग'वर लक्ष केंद्रित करत होती.
