TRENDING:

VIDEO : W,W,W,W...एकाच ओव्हरमध्ये अर्धा संघ तंबुत, T20 वर्ल्डकपमधली पहिली हॅट्ट्रीक कुणी घेतली?

Last Updated:

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या दुसऱ्यात सामन्यात मोठा रेकॉर्ड झाला आहे. एका गोलंदाजाने या वर्ल्डकपची पहिली हट्ट्रीक घेतली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
West Indies vs Scotland : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या दुसऱ्यात सामन्यात मोठा रेकॉर्ड झाला आहे. एका गोलंदाजाने या वर्ल्डकपची पहिली हट्ट्रीक घेतली आहे. त्याने सूरुवातीला तीन विकेट घेतले आणि त्यानंतर आणखी एक विकेट घेतली.अशाप्रकारे त्याने एकाच ओव्हमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे जवळजवळ अर्धा संघ तंबुत परतला होता.या एका ओव्हरने अख्खी मॅच फिरली होती.
romario shepherd
romario shepherd
advertisement

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून वेस्ट इंडिजचा रोमारीओ शेफर्ड आहे. रोमारियो शेफर्डने स्कॉटलँड विरूद्ध या वर्ल्डकपची पहिली हॅट्ट्रीक घेतली होती. हे विकेट नेमके त्याने कसे घेतले होते? हे जाणून घेऊयात.

16व्या षटकात रोमारियो शेफर्डने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि सामना पूर्णपणे वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकवला. या षटकात त्याने सलग विकेट्स घेत स्कॉटलंडच्या फलंदाजीची घडी विस्कटली.

advertisement

advertisement

16.2

क्रॉसने बाहेर टाकलेल्या चेंडूवर कव्हर ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या रदरफोर्डने सहज झेल घेतला. क्रॉस 11 धावांवर बाद.

16.3

मायकल लीस्क मैदानात आला आणि पहिल्याच चेंडूवर बाद झाला. फुल लेंथ चेंडू उंच फटकावण्याच्या नादात लीस्कने लॉंगऑनकडे मारलेला फटका पॉवेलने अप्रतिम झेल घेत पकडला. झेल घेताना पॉवेलच्या खांद्याला थोडी झळ बसली, पण तो सुरक्षित राहिला.

advertisement

16.4 – हॅट्ट्रिक!

ऑलिव्हर डेव्हिडसन पहिल्याच चेंडूवर शेफर्डचा बळी ठरला. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला सीमअप चेंडू आत वळला, डेव्हिडसनचा बॅट चुकला आणि थेट ऑफ स्टंप उडाला. याच चेंडूसह शेफर्डने T20 वर्ल्डकपमधील ऐतिहासिक हॅट्ट्रिक पूर्ण केली.

16.5

सफयान शरीफने संयम राखत बॉल बॅकवर्ड पॉइंटकडे ढकलला, मात्र धाव मिळाली नाही.

16.6 – फाइफर पूर्ण!

advertisement

षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शरीफने उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण मिड-ऑफवर उभ्या असलेल्या जेसन होल्डरने ‘रिव्हर्स कप’ स्टाइलमध्ये सहज झेल घेतला. यासह शेफर्डने आपल्या कारकिर्दीतील शानदार पाच विकेट्स पूर्ण केल्या.

या एका षटकात चार विकेट्स आणि एक हॅट्ट्रिक घेत रोमारियो शेफर्डने सामना अक्षरशः एकहाती फिरवला. स्कॉटलंडचा संघ या धक्क्यातून सावरू शकला नाही आणि वेस्ट इंडिजचा विजय जवळपास निश्चित झाला.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडिजने 182 धावा ठोकल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलँड 147 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ 35 धावांवर बाद झाला होता.

वेस्ट इंडिजचे T20I हॅट्रिक विक्रम

जेसन होल्डर vs इंग्लंड – ब्रिजटाउन, 2022

रोमारियो शेफर्ड vs बांगलादेश – चट्टोग्राम, 2025

शमार स्प्रिंगर vs अफगाणिस्तान – दुबई, 2026

रोमारियो शेफर्ड vs स्कॉटलंड – कोलकाता, 2026

रोमारियो शेफर्डने दोन वेळा हॅट्रिक घेत वेस्ट इंडिजसाठी इतिहास रचला आहे.

T20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचे 5 विकेट्स घेणारे गोलंदाज

5/11 – अकील होसैन vs युगांडा, प्रोव्हिडन्स (2024)

5/20 – रोमारियो शेफर्ड vs स्कॉटलंड, कोलकाता (2026)

T20 वर्ल्डकपमधील ऐतिहासिक हॅट्रिक्स

ब्रेट ली vs बांगलादेश – केपटाउन, 2007

कर्टिस कॅम्पर vs नेदरलँड्स – अबुधाबी, 2021 (सलग 4 विकेट्स)

वनिंदू हसरंगा vs दक्षिण आफ्रिका – शारजाह, 2021

कगिसो रबाडा vs इंग्लंड – शारजाह, 2021

कार्तिक मयप्पन vs श्रीलंका – गेलाँग, 2022

जोश लिट्ल vs न्यूझीलंड – अ‍ॅडलेड, 2022

पॅट कमिन्स vs बांगलादेश – नॉर्थ साउंड, 2024

पॅट कमिन्स vs अफगाणिस्तान – आर्नोस व्हेल, 2024

ख्रिस जॉर्डन vs अमेरिका – ब्रिजटाउन, 2024

रोमारियो शेफर्ड vs स्कॉटलंड – कोलकाता, 2026

दोन वेळा T20I हॅट्रिक घेणारे गोलंदाज (पूर्ण सदस्य संघ)

लसिथ मलिंगा – श्रीलंका

टिम साऊदी – न्यूझीलंड

पॅट कमिन्स – ऑस्ट्रेलिया

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी भांडवलात सुरू करा तेल घाणा व्यवसाय, मिळेल नफाच नफा, संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

रोमारियो शेफर्ड – वेस्ट इंडिज

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : W,W,W,W...एकाच ओव्हरमध्ये अर्धा संघ तंबुत, T20 वर्ल्डकपमधली पहिली हॅट्ट्रीक कुणी घेतली?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल