पीएम मोदींचा प्रश्न, स्मृती मनधानाचं भावुक उत्तर
पीएम मोदींनी स्मृती मनधानाला प्रश्न विचारला की, तुला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रेरणा कशी मिळाली? उत्तर देतांनी स्मृती म्हणाली, ''आम्ही २०१७ मध्ये तुमच्याकडे आलो होतो तेव्हा आमच्याकडे ट्रॉफी नव्हती. याचं आम्हाला खूप दु: ख होतं. आम्ही खूप प्रयत्न करत होतो. जवळ जवळ ७ ते ८ वर्ष आम्ही प्रचंड मेहनत केली. भारतातच वर्ल्ड कप जिंकू हा आत्मविश्वास आमच्याकडे होता.आणि तो आम्ही जिंकलो असं त्यासाठी तुम्हीच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरलात.'' अशी भावना स्मृती मनधानाने व्यक्त केली.
advertisement
मोदींच्या स्कीन केअरची चर्चा
दुसरीकडे मोदींसह चर्चा करत असताना भारताची खेळाडू हरलीन देओल हिने मोदीजींना एक प्रश्न विचार त्यानंतर तिथे उपस्थित सर्वच हसू लागले. हरलीनने मोदीजींना विचारल की, तुमचं स्किन केअर रुटीन काय आहे? तुम्ही नेहमीच फ्रेश आणि सुंदर दिसता. यावर मोदीजींनी उत्तर दिल की, मी याबाबद्दल कधी असा विचारच केला नव्हता.
भारताने इतिहास रचला
महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावलं. भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 7 गडी गमावून 298 धावांची भक्कम मजल मारली. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवर आटोपला. या विजयात दीप्ती शर्मा चमकली. तिने केवळ पाच बळी घेत सामन्याचा प्रवाह भारताच्या बाजूने वळवला.
दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्टने शतकी (101) खेळी करत संघाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या उत्कृष्ट खेळीला इतरांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. परिणामी भारताने सामन्यात निर्णायक वर्चस्व राखले. हा विजय भारतीय महिला क्रिकेटसाठी सुवर्णक्षण ठरला आहे. 1973 मध्ये सुरू झालेल्या महिला वनडे वर्ल्ड कपच्या 52 वर्षांच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच विजेतेपद आपल्या झोळीत घातले. दीप्तीशिवाय युवा खेळाडू शेफाली वर्मानेही उत्कृष्ट सर्वांगीण कामगिरी केली. तिने फलंदाजीत 87 धावा झळकावत भारताचा डाव स्थिर केला आणि नंतर गोलंदाजीत दोन महत्त्वाचे गडी बाद केले. तिच्या या दमदार कामगिरीसाठी तिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
