TRENDING:

IND vs USA T20 : टीम इंडियाचं टेन्शन खल्लास! पहिल्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये सूर्याने दिली गुड न्यूज!

Last Updated:

India vs United States of America T20 World Cup : खेळाडूंच्या इंज्युरी अपडेट देताना सूर्याने सांगितलं की, वॉशिंग्टन सुंदर आता फिट असून तो दिल्लीत टीमसोबत सामील होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs USA T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा श्रीगणेशा काल पाकिस्तानच्या विजयाने झाला तर रात्री झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएसएविरुद्ध 29 धावांनी विजय नोंदवला अन् वर्ल्ड कपच्या विजायाचा नारळ फोडला आहे. पण वानखेडेवर झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाची मोठी फजिती झाली होती. कॅप्टन सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला सावरलं अन् मॅच जिंकवून दिली. अशातच मॅच संपल्यावर सूर्याने गुड न्यूज दिली आहे.
India vs United States of America T20 World Cup
India vs United States of America T20 World Cup
advertisement

टीम इंडियाने मॅच खिशात घातली

टॉस जिंकून युएसएने टीम इंडियाला जमिनीवर आणलं. भारताची अवस्था एका वेळी 77 धावांवर 6 विकेट्स अशी बिकट झाली होती. तिथून सूर्याने मॅच काढली अन् 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यामुळे बॉलर्सला फाईट करायला संधी मिळाली अन् टीम इंडियाने मॅच खिशात घातली. मुंबईच्या आझाद मैदान आणि क्रॉस मैदान अशा मैदानांवर मी खूप क्रिकेट खेळलो असल्याने मला स्वतःवर पूर्ण विश्वास होता, असं सूर्या म्हणाला. यावेळी सूर्याने एका खेळाडूविषयी खुलासा केला.

advertisement

वॉशिंग्टन सुंदरवर काय म्हणाला कॅप्टन सूर्या? 

खेळाडूंच्या इंज्युरी अपडेट देताना सूर्याने सांगितलं की, वॉशिंग्टन सुंदर आता फिट असून तो दिल्लीत टीमसोबत सामील होईल. जसप्रीत बुमराह आणि अभिषेक शर्मा यांना वातावरणातील बदलामुळे ताप आला होता, पण सध्या सर्व काही ठीक आहे. आता पुढच्या मॅचसाठी 5 दिवसांचा वेळ असून टीम इंडिया अधिक जोमाने मैदानात उतरेल, असा विश्वास कॅप्टन सूर्याने चाहत्यांना दिला.

advertisement

निसर्गाच्या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात - सूर्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, वानखेडेची खेळपट्टी आज नेहमीपेक्षा थोडी वेगळी होती, असंही सूर्याने स्पष्ट केलं. सकाळी सूर्यप्रकाश कमी असल्याने पिच रोलिंग आणि पाणी देण्याच्या कामात मर्यादा आल्या असाव्यात, असं त्याने नमूद केलं. क्युरेटरने त्यांचे प्रयत्न केले असले तरी, निसर्गाच्या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात, त्यामुळे आम्ही पिचचे कारण देऊन आमची खराब बॅटिंग लपवू शकत नाही, असंही सूर्याने प्रामाणिकपणे मान्य केलं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs USA T20 : टीम इंडियाचं टेन्शन खल्लास! पहिल्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये सूर्याने दिली गुड न्यूज!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल