टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स या टीमचा समावेश आहे. याआधी मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारत, पाकिस्तान, अमेरिका एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातला सामना मुंबईमध्ये तर भारत-नामिबियाची मॅच दिल्लीला होईल. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.
advertisement
पाकिस्तानचे सामने कोलंबोमध्ये
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारतात खेळायला नकार दिल्यामुळे त्यांचे सगळे सामना श्रीलंकेमध्ये होणार आहेत. पाकिस्तानची टीम सेमी फायनल तसंच फायनलला पोहोचली तर हे दोन्ही सामने श्रीलंकेमध्येच होतील. तसंच पाकिस्तान सेमी फायनल आणि फायनलला पोहोचली नाही, तर हे सामने भारतात खेळवले जातील. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतातल्या 5 तर श्रीलंकेतल्या 3 स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील. भारतात मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलकात्यामध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या मॅच होतील. तर श्रीलंकेत आर प्रेमदासा, सिनहलसी आणि केन्डीमध्ये सामने खेळवले जातील.
टीम इंडियाचं वेळापत्रक
7 फेब्रुवारी- भारत विरुद्ध अमेरिका, मुंबई
12 फेब्रुवारी- भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली
15 फेब्रुवारी- भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
18 फेब्रुवारी- भारत विरुद्ध नेदरलँड्स, अहमदाबाद
या 20 टीम सहभागी होणार
भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान, युएई
