TRENDING:

6 बॉल 6 सिक्स, फास्टेस्ट फिफ्टी... युवराजचं रेकॉर्ड मोडणारा इंग्लंडला नडला, कोण आहे नेपाळचा धुरंदर?

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये नेपाळ आणि इंग्लंड यांच्यात थरारक सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने पहिले बॅटिंग करताना 184 रन केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये नेपाळ आणि इंग्लंड यांच्यात थरारक सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने पहिले बॅटिंग करताना 184 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळने 20 ओव्हरमध्ये 180 रन केले, त्यामुळे त्यांचा 4 रननी पराभव झाला. या सामन्यात नेपाळला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे बरेच चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते.
6 बॉल 6 सिक्स, फास्टेस्ट फिफ्टी... युवराजचं रेकॉर्ड मोडणारा इंग्लंडला नडला, कोण आहे नेपाळचा धुरंदर?
6 बॉल 6 सिक्स, फास्टेस्ट फिफ्टी... युवराजचं रेकॉर्ड मोडणारा इंग्लंडला नडला, कोण आहे नेपाळचा धुरंदर?
advertisement

नेपाळच्या चाहत्यांना दीपेंद्र सिंग ऐरी याच्याकडून अपेक्षा होत्या. दीपेंद्रने 29 बॉलमध्ये 44 रनची खेळी केली, ज्यात 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. दीपेंद्र सिंगच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंगचा विक्रम मोडण्याचा रेकॉर्ड आहे. दीपेंद्रने युवराजप्रमाणेच 6 बॉल 6 सिक्स मारल्या आहेत आणि सगळ्यात जलद अर्धशतकही ठोकलं आहे.

कोण आहे दीपेंद्र सिंग ऐरी?

advertisement

दीपेंद्र सिंग ऐरीचा जन्म 24 जानेवारी 2000 साली झाला. दीपेंद्र सिंग हा बॅटिंगसोबतच ऑफ स्पिनर बॉलिंगही करतो. 2023 साली मंगोलियाविरुद्ध दीपेंद्र सिंग ऐरीने फक्त 9 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद अर्धशतकाचा हा विक्रम अजूनही दीपेंद्र सिंग ऐरीच्या नावावर आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रविवारी मार्केट हाललं, आल्याची आवक वाढली, डाळिंब अन् केळीला किती मिळाला भाव?
सर्व पहा

दीपेंद्र सिंग ऐरीशिवाय लोकेश बामने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 20 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 39 रन केले. तर कर्णधार रोहित पौडेलने 34 बॉल 39 आणि कुशल भुरटेलने 17 बॉल 29 रनची खेळी केली. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधला हा आतापर्यंतचा सगळ्यात रोमांचक सामना होता. शेवटच्या ओव्हरमध्ये नेपाळला विजयासाठी 10 रनची गरज होती, पण सॅम करनने अचूक बॉलिंग करत फक्त 5 रन दिले, त्यामुळे नेपाळच्या हातात आलेला विजय निसटला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
6 बॉल 6 सिक्स, फास्टेस्ट फिफ्टी... युवराजचं रेकॉर्ड मोडणारा इंग्लंडला नडला, कोण आहे नेपाळचा धुरंदर?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल