वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात शून्य रनवर आऊट झालेला अभिषेक शर्मा हा भारताचा पाचवा खेळाडू आहे. अभिषेकच्या आधी गौतम गंभीर, आशिष नेहरा, शार्दुल ठाकूर आणि दीपक हुड्डा त्यांच्या वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात शून्य रनवर आऊट झाले होते.
टीम इंडिया अडचणीत
या सामन्यात युएसएने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर युएसएने टीम इंडियाला चांगलंच अडचणीत आणलं. 46 रनवरच टीम इंडियाचे सुरूवातीचे 4 खेळाडू आऊट झाले. इशान किशन 20 रनवर, तिलक वर्मा 25 रनवर आणि शिवम दुबेही पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला.
advertisement
युएसएविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा दिग्गज फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह खेळत नाहीये. मॅचच्या दिवशी सकाळी बुमराहची तब्येत बिघडली, त्यामुळे तो मॅचमधून बाहेर झाला. बुमराहऐवजी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
