TRENDING:

T20 World Cup Final मुंबई का अहमदाबादला? आयसीसीने जाहीर केलं वर्ल्ड कपचं शेड्यूल

Last Updated:

आयसीसीने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. यंदाही आयसीसीने भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयसीसीने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना गतविजेती टीम इंडिया आणि युएसएमध्ये होणार आहे. स्पर्धेमध्ये एकूण 20 टीम सहभागी होणार आहेत, यातल्या 5-5 टीमना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. या 4 ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सुपर-8 स्टेजमध्ये क्वालिफाय होतील.
T20 World Cup Final मुंबई का अहमदाबादला? आयसीसीने जाहीर केलं वर्ल्ड कपचं शेड्यूल
T20 World Cup Final मुंबई का अहमदाबादला? आयसीसीने जाहीर केलं वर्ल्ड कपचं शेड्यूल
advertisement

सुपर-8 मधल्या टॉप-4 टीम सेमी फायनलमध्ये खेळतील. टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया यांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी 2024 च्या वर्ल्ड कपमध्येही भारत, पाकिस्तान आणि युएसए एकाच ग्रुपमध्ये होते. मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात आलं होतं.

फायनल मुंबई का अहमदाबादला?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध ताणले गेल्यामुळे पाकिस्तान त्यांचे सगळे सामने श्रीलंकेमध्ये खेळणार आहे. तसंच पाकिस्तानची टीम सेमी फायनल आणि फायनलला क्वालिफाय झाली, तर हे दोन्ही सामने श्रीलंकेमध्येच खेळवले जातील. पण पाकिस्तान सेमी फायनल किंवा फायनलला पोहोचली नाही तर भारतामध्येच हे सामने खेळवले जातील. टी-20 वर्ल्ड कपची फायनल 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवली जाईल. तर पहिली सेमी फायनल 4 मार्चला कोलकाता किंवा कोलंबोमध्ये होईल. टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

advertisement

भारत आणि पाकिस्तान यांचा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. याआधी आशिया कपमध्ये दोन्ही टीम तीनवेळा आमने-सामने आल्या होत्या, या तीनही सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये फक्त एकदाच पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने दिलेलं 120 रनचं आव्हानही पाकिस्तानला पार करता आलं नव्हतं. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळलेल्या टीम इंडियाचा विजय झाला होता. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही टीमची साथ सोडली होती.

advertisement

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं वेळापत्रक

भारत विरुद्ध अमेरिका, 7 फेब्रुवारी, मुंबई

भारत विरुद्ध नामिबिया, 12 फेब्रुवारी, दिल्ली

भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 फेब्रुवारी, कोलंबो

भारत विरुद्ध नेदरलँड्स, 18 फेब्रुवारी, अहमदाबाद

या 20 टीम सहभागी होणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलटफेर, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान, युएई

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup Final मुंबई का अहमदाबादला? आयसीसीने जाहीर केलं वर्ल्ड कपचं शेड्यूल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल