टी-20 वर्ल्ड कपसाठी प्रत्येकी 5 टीमना ए, बी, सी आणि डी अशा चार ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, युएसए, नामिबिया आणि नेदरलँड्स आहेत. तर ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड आणि ओमान आहेत. ग्रुप सी मध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली यांचा समावेश आहे. ग्रुप डी मध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा आणि युएई आहेत.
advertisement
ग्रुप ऑफ डेथ
भारताचे दिग्गज कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा होताच धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे. या चार ग्रुपमध्ये ग्रुप डी हा ग्रुप ऑफ डेथ आहे, कारण न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या दोनच टीम सुपर-8 मध्ये पोहोचणार आहेत, असं हर्षा भोगले म्हणाले आहेत. तसंच सुपर-8 मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड पोहोचतील, असं हर्षा भोगले यांना वाटत आहे.
प्रत्येक ग्रुपमधल्या टॉप-2 टीम या सुपर-8 मध्ये प्रवेश करतील, त्यानंतर सुपर-8 मध्ये सर्व 8 टीम एकमेकांविरुद्ध खेळतील. सुपर-8 राऊंडनंतर पॉईंट्स टेबलमधल्या टॉप-4 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.
कुठे होणार सामने?
टी-20 वर्ल्ड कपचे सामने भारतात मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलकात्यामध्ये होणार आहेत. तर श्रीलंकेमध्ये कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियम, सिनहलसी स्टेडियम आणि केन्डीमध्ये आयोजित केले जातील. पहिली सेमी फायनल 4 मार्चला कोलकाता किंवा कोलंबोमध्ये होईल. टी-20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड कपची फायनल 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाईल.
भारताचे ग्रुप स्टेजचे सामने
भारत विरुद्ध अमेरिका, 7 फेब्रुवारी, मुंबई
भारत विरुद्ध नामिबिया, 12 फेब्रुवारी, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 फेब्रुवारी, कोलंबो
भारत विरुद्ध नेदरलँड्स, 18 फेब्रुवारी, अहमदाबाद
कोणत्या 20 टीम खेळणार?
भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, युएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान, युएई
