TRENDING:

T20 वर्ल्ड कपमध्ये द्रविडचा मोहरा फुटला, श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सांगतोय 'टॉप सिक्रेट'!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप 2026 ला सुरूवात झाली आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कप 2026 ला सुरूवात झाली आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. 2024 सालचा टी-20 वर्ल्ड कप जिंकलेली टीम इंडिया यंदा त्यांच्याकडे असलेली ट्रॉफी पुन्हा आपल्याकडेच ठेवण्यासाठी मैदानात उतरली आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरली होती, तर राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता.
T20 वर्ल्ड कपमध्ये द्रविडचा मोहरा फुटला, श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सांगतोय 'टॉप सिक्रेट'!
T20 वर्ल्ड कपमध्ये द्रविडचा मोहरा फुटला, श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सांगतोय 'टॉप सिक्रेट'!
advertisement

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर राहुल द्रविड आणि त्याच्या कोचिंग स्टाफनेही टीम इंडियाची साथ सोडली. भारतीय टीमची साथ सोडल्यानंतर आता द्रविडचा सहकारी श्रीलंकेच्या टीममध्ये गेला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विक्रम राठोड टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचा बॅटिंग कोच झाला आहे.

विक्रम राठोड सप्टेंबर 2019 ते जुलै 2024 अशी 5 वर्ष टीम इंडियाचा बॅटिंग कोच होता. 2019 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर संजय बांगरच्या जागी विक्रम राठोड याची बॅटिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली. विक्रम राठोड प्रशिक्षक असताना टीम इंडिया 2023 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली, तसंच 2024 चा टी-20 वर्ल्ड कप भारतीय टीमने विजय मिळवला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अलंकापुरीची इंद्रायणी की ‘फेस’गंगा? Video पाहाल तर आळंदीकरांसारखंच बोलाल!
सर्व पहा

विक्रम राठोडने 1996 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सचिन तेंडुलकरसोबत ओपनिंगला बॅटिंग केली. विक्रम राठोड भारताकडून 6 टेस्ट आणि 7 वनडे मॅच खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विक्रम राठोडने उल्लेखनीय कामगिरी केली. 146 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये विक्रम राठोडने 49.67 च्या सरासरीने 11,473 रन केल्या, ज्यात 33 शतकं आणि 49 अर्धशतकांचा समावेश होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये विक्रम राठोडने 99 सामन्यांमध्ये 33.99 च्या सरासरीने 3,161 रन केले. लिस्ट ए मध्ये विक्रम राठोडच्या नावावर 7 शतकं आणि 14 अर्धशतकं आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपमध्ये द्रविडचा मोहरा फुटला, श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सांगतोय 'टॉप सिक्रेट'!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल