भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या या मुली फक्त क्रिकेटपटू नाहीत, तर भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील स्वप्न त्यासाठीची धडपड आणि जिद्दीचं प्रतीक आहेत. 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आलेल्या या मुली एकत्र आल्या आणि त्यांनी जगाला दाखवून दिलं, की तुम्ही कोणत्याही कोपऱ्यातून आलात तरी मेहनतीला दिशा नक्कीच मिळते. क्रिकेट त्यांच्या हातातलं साधन होतं, पण त्यांचं ध्येय स्वत:चं नाव बनवण्याचं होतं. भारताच्या महिला खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसणारा हा आत्मविश्वास भारताच्या प्रत्येक मुलीला सांगतोय, जिथे तू आहेस, तिथून सुरूवात कर, मैदान आपोआप तयार होईल.
advertisement
टीम इंडियाच्या मुलींचा संघर्ष
स्नेह राणा (उत्तराखंड)- वडिलांच्या निधनानंतरही त्यांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढली. दुखापतीतून कमबॅक करताना स्नेह राणा टीमची बॉलिंग स्टार बनली.
रेणुका ठाकूर (हिमाचल प्रदेश)- आईच्या आधारावर मोठी झालेली रेणुका, वडिलांच्या आठवणीने प्रेरणा घेत भारतीय टीमची 'पेस क्वीन' ठरली.
अमनजोत कौर (पंजाब)- अमनजोतचे वडील सुतार आहेत, पण तिने वडिलांच्या हातोड्याऐवजी हातात बॅट घेतली, यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. डेब्यू मॅचमध्येच अमनजोत प्लेअर ऑफ द मॅच ठरली.
हरमनप्रीत कौर (पंजाब)- गावातल्या छोट्या ग्राऊंडवरून सुरू झालेली हरमनप्रीतची कहाणी आज भारताच्या सगळ्यात यशस्वी कॅप्टनपर्यंत येऊन पोहोचली आहे.
दीप्ती शर्मा (उत्तर प्रदेश)- रेल्वे कर्मचाऱ्याची मुलगी, भावाने पहिली बॅट दिली. वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक करून 5 विकेट घेतल्या आणि इतिहास घडवला.
उमा चेत्त्री (आसाम)- शेतकरी कुटुंबातील मुलगी टीम इंडियाची विकेट कीपर झाली. उमाने लहानपणी लाकडाच्या काठीपासून क्रिकेट खेळायला सुरूवात केली.
क्रांती गौड (मध्य प्रदेश)- छोट्या गावातून आलेल्या क्रांतीने समाजाच्या चौकटी मोडून क्रांती घडवली.
श्री चरणी (आंध्र प्रदेश)- थर्मल पॉवर प्लांट कर्मचाऱ्याची मुलगी, संसाधन आणि सुविधा कमी असतानाही प्रचंड जिद्दीच्या जोरावर श्री चरणी इथपर्यंत येऊन पोहोचली.
जेमिमा रॉड्रिग्ज (महाराष्ट्र)- क्रिकेट आणि हॉकी दोन्ही खेळांमध्ये स्वत:चं टॅलेंट दाखवलं. बालपणीचं स्वप्न सत्यात उतरवलं.
स्मृती मंधाना (महाराष्ट्र)- क्रिकेटप्रेमी घरात वाढलेली स्मृती मंधाना आज भारतीय क्रिकेटमध्ये मोठा ब्रँड बनली आहे.
राधा यादव (महाराष्ट्र)- वडिलांचा भाजीचा ठेला, मुंबईमध्ये छोटं घर, पण तरीही जिद्द न सोडता राधाने संघर्ष केला आणि टीमची मुख्य स्पिनर बनली.
हर्लीन देओल (पंजाब)- कामगार कुटुंबातील मुलगी, भावाला बघून बॅट हातात घेतली आणि थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकली.
शफाली वर्मा (हरियाणा)- गावातल्या मुलांसोबत खेळता खेळता शफाली वर्मा भारताची पॉवर हिटर बनली. अवघ्या काही सामन्यांमध्ये शफाली वर्माने टीम इंडियाची लेडी सेहवाग म्हणून ओळख बनवली.
प्रतिका रावल (दिल्ली)- क्रिकेट अंपायरची मुलगी असलेली प्रतिका रावलने स्वत:ला खेळाडू म्हणून सिद्ध केलं.
ऋचा घोष (पश्चिम बंगाल)- वडिलांकडून घेतलेली विकेटकीपिंगची टीप, वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कीपिंगसोबतच आक्रमक बॅटिंग करून मदतीला धावली.
अरुंधती रेड्डी (तेलंगणा)- सिंगल मदरची मुलगी, लहानपणापासूनच कष्टाचं आणि संघर्षाचं आयुष्य जगत वर्ल्ड चॅम्पियन टीमचा भाग बनली.
