पपई शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीरच आहे, मात्र यंदा परतीच्या पावसामुळे काही प्रमाणात पपई बागाचं नुकसान झालं आहे, झाडांची फळे गळली आहे तरी देखील सध्याच्या झाडांची स्थिती पाहता खत-औषधांसह इतर खर्च वजा करून 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळेल असे रामेश्वर पवार यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे. पपई झाडांना पोषण मिळावं म्हणून सुरुवातीच्या काळात रासायनिक खताचा जास्त वापर केला होता. आता मात्र शेणखताचा वापर करत आहे.
advertisement
शिवाय, जीवामृत, गोवमृत असे खत- औषध सध्या वापरत आहोत की ज्यामुळे जास्त खर्च होणार नाही आणि फळाला पोषकही ठरेल याबरोबरच ठिबक सिंचन द्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने नियोजन करून पपई शेती केली जात असल्याचे देखील पवार यांनी म्हटले आहे. पपई शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना काही हरकत नाही, मात्र यामध्ये सातत्य आणि नियोजन पद्धती महत्त्वाची आहे. पपईचे उत्पन्न सर्व बाजारामधील पपईची विक्री आणि मागणीवर सर्व काही अवलंबून आहे. चांगल्या पद्धतीने शेती करून सरासरी काढली तर या शेतीचा खर्च वजा करून नफाही मिळू शकतो.