TRENDING:
LIVE NOW

PM Modi Live : आणखी काही काळ युद्ध सुरू राहू शकतं, सतर्क आणि सावध राहा- पीएम मोदी

Last Updated:

Iran War Pm Narendra Modi Live: युद्धाचा परिणाम आशियातील मार्केटपासून ते सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत झाला आहे. अगदी गॅसपासून ते इंधनापर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. LPG व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असल्याने 40 टक्क्यांहून अधिक छोटे मोठे उद्योग पूर्ण ठप्प आहेत. अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीचे पर्याय वापरले जात आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Iran War Pm Narendra Modi Live: आखातामध्ये संघर्ष सुरू आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या झळा आता मार्यादीत देशांपुरत्याच नाहीत तर जगभरात बसत आहेत. या युद्धाचा परिणाम आशियातील मार्केटपासून ते सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत झाला आहे. अगदी गॅसपासून ते इंधनापर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. LPG व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असल्याने 40 टक्क्यांहून अधिक छोटे मोठे उद्योग पूर्ण ठप्प आहेत. अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीचे पर्याय वापरले जात आहेत.

इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध इराणने सुरू केलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाचा आढावा घेण्यात आला आणि प्रस्तावित मदत उपाययोजनांवर चर्चा झाली.

बैठकीदरम्यान, मंत्रिमंडळ सचिवांनी जागतिक परिस्थिती आणि भारत सरकारच्या सर्व संबंधित मंत्रालये/विभागांनी घेतलेल्या व घेत असलेल्या उपाययोजनांवर सविस्तर सादरीकरण केले. कृषी, खते, अन्न सुरक्षा, पेट्रोलियम, ऊर्जा, एमएसएमई, निर्यातदार, जहाजबांधणी, व्यापार, वित्त, पुरवठा साखळी यांसारख्या विविध क्षेत्रांवर आणि सर्व प्रभावित क्षेत्रांवर होणारा अपेक्षित परिणाम आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी घेतल्या जात असलेल्या उपाययोजनांवर चर्चा झाली. देशाचा एकूण स्थूल आर्थिक दृष्टिकोन आणि पुढे घ्यावयाच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली.

या सगळ्यावर पीएम नरेंद्र मोदी आज दुपारी 2 वाजता लोकसभेतून बोलणार आहेत. संकटात सापडलेल्या भारतासाठी पुढचा प्लॅन काय आणि कसा असेल याबााबत पीएम मोदी माहिती देणार आहेत.
पीएम मोदी LIVE
पीएम मोदी LIVE
advertisement
Mar 23, 20262:27 PM IST

बॉर्डर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, नौदलला तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बाहेर युरिया 3000 रुपयांना मिळत आहे. मात्र भारतात स्वस्त दरात खत दिलं जात आहे. हे युद्ध मानवतेच्या हिताचं नाही. बॉर्डर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, नौदलला तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरक्षा अधिक वाढवण्यात आल्या आहेत.
Mar 23, 20262:27 PM IST

हे युद्ध लवकर संपणार नाही. काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार- पीएम मोदी

हे युद्ध लवकर संपणार नाही. काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. युद्धाचे दीर्घकालीन परिणाम भोगवे लागू शकतात. त्यामुळे कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एकत्र येऊन लढल्यास सगळ्या संकटांना तोंड देता येईल.
Mar 23, 20262:22 PM IST

डॉलर मजबूत, शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप

शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठी घसरण, 2000 अंकांनी कोसळलं सेन्सेक्स मात्र त्याही ग्रीन एनर्जी, सोलार, सारखे शेअर्स सध्या चांगले परफॉर्म करत आहेत. दुसरीकडे चांदीला लोअर सर्किट लागलं आहे. डॉलर मजबूत झालं आहे.
advertisement
Mar 23, 20262:14 PM IST

भारताचं भविष्य अधिक सुरक्षित होईल असा पीएम मोदींनी विश्वास व्यक्त केला.

विजेवर चालणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे डिझेल खरेदी करण्याचं प्रमाण कमी झालं. मेट्रोच्या जाळ्यामुळे देखील भारताला फायदा झाला. इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर दिला त्याचा फायदा भारताला झाला. भारताचं भविष्य अधिक सुरक्षित होईल असा पीएम मोदींनी विश्वास व्यक्त केला.
Mar 23, 20262:12 PM IST

शक्य तिथून गॅस आणि तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्यावर भर- पीएम मोदी

भारतात गॅस उत्पादन वाढवण्याला भर देत आहे. याआधी 70 देशांमधून गॅस आयात करत होतं आता 41 देशांमधून करत आहे. खतांसाठी देखील मोठा फटका बसला आहे. शक्य आहे तिथून गॅस आणि तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्यावर भर दिला आहे.
Mar 23, 20262:09 PM IST

देशात गॅसचा तुटवडा- पीएम मोदी

हार्मुज समुद्रधुनीमधून कच्च तेल आणि गॅस येत आहे. हार्मुजमधून येणं जाणं जास्त धोक्याचं झालं आहे. युद्धाचा फटका बसला आहे. देशात 60 टक्के LPG आयात केलं जातं. त्यामुळे प्राधान्य घरगुती गॅस सिलिंडरना देण्यात आलं आहे. तर देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे.
advertisement
Mar 23, 20262:08 PM IST

भारतीयांच्या सुरक्षेबाबत पीएम मोदींची महत्त्वाची माहिती

३ लाख 75 हजार भारतीय सुरक्षितरित्या भारतात आले. 700 हून अधिक मेडिकलचा अभ्यास करणारे आहेत. भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे.
Mar 23, 20262:07 PM IST

युद्धाचा . इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम- पीएम मोदी

युद्धाचा फटका सर्वसामान्य लोकांना सर्वाधिक बसला आहे. आखाती देशात 1 कोटी भारतीय काम करतात. युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. मी स्वत: आखाती देशांमध्ये फोन करून याबाबत माहिती घेतली आहेत. आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना मदत केली जात आहे. दुर्देवानं काही भारतीय अजूनही बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू आहे.
Mar 23, 20262:03 PM IST

युद्धात भारतही अप्रत्यक्षपणे होरपळतोय- पीएम मोदी

तीन आठवड्यांपेक्षा जास्त संघर्ष सुरू, त्याचा परिणाम आता लोकांच्या आयुष्यावर होत आहे. भारतासमोरही या युद्धामुळे अप्रत्यक्ष आव्हानं समोर आणली आहेत. ही आव्हानं आर्थिक, नॅशनल सिक्युरिटी आणि इतरही आहेत. युद्धात अप्रत्यक्षरित्या होरपळत आहे.
advertisement
Mar 23, 20261:55 PM IST

शेअर मार्केटमध्ये हाहाकार! 1900 अंकांनी कोसळलं सेन्सेक्स, या सेक्टरला सर्वात जास्त फटका

होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटममुळे बाजारात घबराट पसरली. निफ्टी ५०० हून अधिक अंकांनी घसरून २२,६०० च्या जवळ पोहोचला. बँकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी सर्वाधिक दबाव टाकला. बँक निफ्टी १,६०० हून अधिक अंकांनी घसरला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप बाजारांमधील विक्रीमुळे बाजारात आणखी घसरण झाली.
Mar 23, 20261:53 PM IST

चांदीला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडाले

शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश, चांदीच्या किंमती 2 लाख रुपयांहून कमी आल्या असून लोअर सर्किट लागला आहे. गुंतवणूकदारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या/देश/
PM Modi Live : आणखी काही काळ युद्ध सुरू राहू शकतं, सतर्क आणि सावध राहा- पीएम मोदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल