भोपाळ, 15 नोव्हेंबर : उच्चशिक्षित होऊन लाखोंची नोकरी मिळवणं, हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र आज असेही अनेक तरुण आहेत जे उच्चशिक्षित होऊन मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी शोधत नाहीत, तर आपल्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करतात. सचिन मादान नामक तरुणही त्यापैकीच एक.
भोपाळचा रहिवासी असलेला सचिन हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जवळपास 15 वर्ष नोकरी करत होता. त्याला महिना पगार होता 50 हजार रुपये. मात्र कोरोना लॉकडाऊनमध्ये सारंकाही पालटलं. या काळात काही लोक व्यावसायिक झाले, तर काही व्यावसायिकांचं काम पूर्णपणे ठप्प झालं. सचिनने याच काळात आपल्या गावात पानांनी बनवलेली ताट, वाटी पाहिली.
advertisement
तेलात भेसळ तर नाही ना? घरच्या घरी ओळखा फक्त 5 मिनिटांत
पानांची भांडी पाहताच सचिनच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. त्यावर त्याने 2020मध्ये अभ्यास करायला सुरुवात केली. त्यानंतर बंगळुरूहून पानांपासून भांडी बनवणारी एक मशीन मागवली. त्यावर तो स्वतः भांडी बनवायला शिकला आणि त्याने स्वतःची कंपनी उभारली. कंपनीचं नाव ठेवलं 'विराज ग्रीन्स'.
झेंडूनी घर सजतं, त्यातून शेतकऱ्यांची कमाई वाचून व्हाल थक्क
त्याने जंगलात राहणाऱ्या लोकांना या व्यवसायातून रोजगार मिळवून दिला. त्यांना स्वतः पानांपासून भांडी बनवायला शिकवलं. आज 300हून अधिक लोक त्याच्या कंपनीत काम करतात. सचिन सांगतो की, आपण बऱ्याचदा प्लॅस्टिकच्या भांड्यांमधून जेवतो. बाहेर जेवताना असं अनेकदा होतं. प्लॅस्टिकच्या भांड्यांमधून जेवणं शरिरासाठी अत्यंत घातक असतं. आपण सर्वांनी मिळून प्लॅस्टिकच्या भांड्यांमधून जेवणं बंद करायला हवं. माझं काम म्हणजेच मी या दिशेने उचललेलं एक पाऊल आहे.
दरम्यान, सचिनने 3 लाख रुपये खर्च करून पानांच्या भांड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. आज त्याची वार्षिक उलाढाल 70 लाख रुपये इतकी आहे. त्याच्या कंपनीत पानांपासून 6 ते 8 प्रकारचे कप, ताट आणि वाटी बनवल्या जातात.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
