TRENDING:

दुकानात चोरी पण CCTV फुटेज पाहून चोरट्याचं होतंय कौतुक, का? Watch Video

Last Updated:

Theft video viral on social media : एका  चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्याचं कौतुक करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : चोरी करणं हा गुन्हा आहे. जर लोकांना चोर दिसला तर त्याला ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. पण जर लोक चोराची स्तुती करू लागले तर? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले का, पण आजकाल एका चोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे, जो पाहिल्यानंतर लोक त्याचं कौतुक करत आहेत.
फोटो : व्हिडीओ ग्रॅब
फोटो : व्हिडीओ ग्रॅब
advertisement

चोरी करण्यासाठी हा चोर एका दुकानात घुसला. चोरीच्या उद्देशाने दुकानात घुसलेल्या या चोराने असं काही केलं, ज्यामुळे लोक त्याचं कौतुक करत आहेत. आता तुम्ही म्हणाल चोर चोरी करायला गेला पण त्याने चोरीचा प्लॅन रद्द केला तर तसं बिलकुल नाही. पण चोरी करण्यापूर्वी त्याने असं काहीतरी केलं ज्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. यानंतर लोकांनी या चोराला सुसंस्कृत चोर म्हणायला सुरुवात केली आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करायला सुरुवात केली.

advertisement

लग्नानंतर नवऱ्यापासून दूर दूर रहायची बायको, कारण असं कुटुंबाला वाटू लागली लाज, पोलीसही शॉक

व्हायरल होत असलेला व्हिडिओ त्याने ज्या दुकानात चोरी केली त्याच दुकानातील सीसीटीव्हीवरून घेण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता चोरट्याने प्रथम दुकानाच्या शटरचं कुलूप तोडलं. यानंतर तो हळूहळू आत येऊ लागला. चोराने प्रथम दुकानातील टेबल पायानं ढकललं. यामुळे तिथं ठेवलेली दुर्गा मातेची प्रतिमा थेट चोराच्या पायावर पडली. चोराला हे कळताच त्याने लगेच तो फोटो उचलला, कपाळाला लावला आणि देवाकडे क्षमा मागितली.

advertisement

दुकानात चोरी झाल्यानंतर दुकानदाराने आत बसवलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा त्याला चोराचं हे कृत्य दिसलं. त्याने त्याची एक क्लिपलोकांसोबत शेअर केली. लोकांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं की हा चोर एक सुसंस्कृत व्यक्ती निघाला. यानंतर सुसंस्कृत चोराबद्दल बरीच चर्चा झाली.

देवीचा आशीर्वाद घेऊन चोरी

दरम्यान याआधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका चोरट्याने मंदिरात अशा पद्धतीने चोरी केली होती. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील ही घटना. @vikassingh218 एक्स अकाऊंटवर याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

advertisement

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मंदिरात भक्त म्हणून आरामात प्रवेश करताना दिसत आहे. मग तो मंदिरात माँ दुर्गाला नमन करतो आणि त्यानंतर तिथे ठेवलेली दानपेटी उचलतो आणि चोरून घेऊन जातो.

वारंवार खिडकीत बादली लटकवायची महिला, पोलिसांनाही अजब वाटलं, घरात गेले, दृश्य पाहूनच चक्रावले

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो माणूस चेहरा झाकेला आहे आहे. तो बाकीच्यांसमोर उभा राहतो. त्यानंतर देवीच्या गर्भागृहात अगदी सहजतेने पोहोचते. मग हात जोडून श्रद्धेने नतमस्तक होतो. काही वेळ नतमस्तक झाल्यावर ही व्यक्ती अगदी निवांतपणे तिथे ठेवलेली दानपेटी उचलते आणि तिथून पोबारा करते.

मराठी बातम्या/Viral/
दुकानात चोरी पण CCTV फुटेज पाहून चोरट्याचं होतंय कौतुक, का? Watch Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल