advertisement

Amitabh Bachchan: 'दुश्मन को ठोक दिया...' अंडर 19 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं कौतुक; बिग बींनी खास पोस्ट शेअर करत नेमकं काय म्हटलं?

Last Updated:

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करत टीम इंडियाचे कौतुक केले आहे. खेळाडूंची कामगिरी पाहून अमिताभ बच्चन यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Amitabh Bachchan: 'दुश्मन को ठोक दिया...' अंडर 19 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं कौतुक; बिग बींनी खास पोस्ट शेअर करत नेमकं काय म्हटलं?
Amitabh Bachchan: 'दुश्मन को ठोक दिया...' अंडर 19 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं कौतुक; बिग बींनी खास पोस्ट शेअर करत नेमकं काय म्हटलं?
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 ची फायनल सामना 6 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेच्या हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवून दणक्यात अंडर 19 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. टीम इंडियाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतूनही टीम इंडियाचे कौतुक केले जात आहे. आता अशातच बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करत टीम इंडियाचे कौतुक केले आहे. खेळाडूंची कामगिरी पाहून अमिताभ बच्चन यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये बिग बींनी लिहिले की, "FB 4569 - अंडर 19 क्रिकेट इंडिया... वर्ल्ड चॅम्पियन! शत्रुचा चांगलाच पराभव केला आहे. महिला क्रिकेट आणि पुरूष क्रिकेट सर्व वर्ल्ड चॅम्पियनमध्ये भारतच नंबर वनवर आहे. सर्वात वर, जगामध्ये पहिल्या क्रमांकावर... आम्ही तिसरं जग नाही तर, आम्ही पहिलं जग आहे. भारत माता की जय" बिग बींची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यांनी टीम इंडियाचे केलेले कौतुक पाहून त्यांच्या पोस्टवर अनेक क्रिकेटप्रेमी सुद्धा कौतुक करीत आहे.
advertisement
दरम्यान, गेल्या महिन्यामध्ये रिलायन्स फाऊंडेशनतर्फे एका भव्य- दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सर्व महिला क्रिकेटर्स आणि अंध महिला क्रिकेटर्सला सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बिग बींनी आपला एक अनुभव शेअर केला होता. ते म्हणाले की, "काही वेळेआधी संपूर्ण जग भारताला तिसऱ्या जगातील देश म्हणून संबोधत होतं. मला काही वर्ष आधी एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळालं होतं. याबद्दल त्या देशातील एका पत्रकाराने त्याच्या बातमीमध्ये, 'तिसऱ्या जगातील देशा'मधील तिसऱ्या दर्जातील सेलिब्रिटींनाही या फिल्म फेस्टिव्हलला आमंत्रित केले आहे, असं लिहिण्यात आलं होतं."
advertisement
बिग बी पुढे म्हणाले की, "त्या पत्रकाराने लिहिलेले आर्टिकल वाचून मला एवढं वाईट नसेल वाटलं जेवढं त्याने थर्ड क्लास एक्टर म्हणून लिहिलेलं वाचून वाईट वाटलं असेल. ती गोष्ट माझ्या मनाला खूपच टोचली. भारताच्या क्रिकेट टीमने सर्व प्रकारांमध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवून वेगवेगळ्या ट्रॉफींवर आपलं नाव कोरलं आहे. भारत आता तीन नंबरचा देश राहिला नसून तो आता नंबर वनवर आहे. आता भारत टॉपवर आहे. "
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Amitabh Bachchan: 'दुश्मन को ठोक दिया...' अंडर 19 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं कौतुक; बिग बींनी खास पोस्ट शेअर करत नेमकं काय म्हटलं?
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement