advertisement

प्रसिद्ध गायकाची कर्करोगाशी झुंज अपयशी, वयाच्या 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Last Updated:

Brad Arnold Dies: ग्रॅमी पुरस्कार नॉमिनेटेड आणि रॉक म्युझिकला एक नवीन ओळख देणारे प्रसिद्ध गायक ब्रॅड अर्नोल्ड यांचे शनिवारी निधन झाले. ते 47 वर्षांचे होते.

News18
News18
हॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. हॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ग्रॅमी पुरस्कार नॉमिनेटेड आणि रॉक म्युझिकला एक नवीन ओळख देणारे प्रसिद्ध गायक ब्रॅड अर्नोल्ड यांचे शनिवारी निधन झाले. ते 47 वर्षांचे होते. आपल्या गाण्याच्या माध्यमातून जगभरातल्या तरूणांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या ब्रॅड अर्नोल्ड यांच्या निधनाने चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. कॅन्सर या दुर्धर आजारामुळे गायकाचे निधन झाले आहे.
ग्रॅमी पुरस्कार नॉमिनेटेड आणि 3 डोअर्स डाऊन बँडचे गाय ब्रॅड अर्नोल्ड यांना गेल्या काही महिन्यांपूर्वीच स्टेज 4 च्या किडनी कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून ते कॅन्सर आजारासोबत लढा देत आहेत. परंतु त्यांची कॅन्सर आजारासोबतची झुंज अपयशी ठरली आहे. गायकाच्या निधनाची माहिती, 3 डोअर्स डाऊन बँडने दिली आहे. त्यांनी अधिकृत निवेदन शेअर करत जगभरातल्या चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे. ब्रॅड अर्नोल्डच्या निधनाने हॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गायकाच्या निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीतल्या म्युझिक क्षेत्रामध्ये केव्हाही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
advertisement
दरम्यान, अधिकृत निवेदनात असं म्हटलंय की, "कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज दिल्यानंतर गायक ब्रॅड अर्नोल्ड यांचे निधन झाले. त्यांनी शनिवारी (7 फेब्रुवारी 2026) अखेरचा श्वास घेतला. त्यांनी झोपेतच जगाचा निरोप घेतला.", अशी अधिकृत माहिती 3 डोअर्स डाऊन बँडकडून देण्यात आली आहे. सध्या ही बातमी सोशल मीडियात वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या चाहत्यांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. ब्रॅड अर्नोल्डला मे 2025 मध्ये स्टेज 4 च्या किडनी कॅन्सरचे निदान झाले होते. त्याच्या फुफ्फुसामध्ये क्लियर सेल रेनल कार्सिनोमा पसरल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून अर्नोल्ड विश्रांतीच घेत होता. त्या दृष्टीनेच गायकावर उपचार सुरु होते. तो धैर्याने या आजाराशी दोन हात करत लढत होता. परंतु अभिनेत्याची ही लढाई अपयशी ठरली.
advertisement
3 डोअर्स डाऊन बँडने 1995 पासून अमेरिकेतल्या मिसिसिपीमध्ये आपल्या म्युझिक प्रवासाला सुरूवात केली होती. 1999 साली सुपरहिट गाण्यांमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्यांच्या गाण्यांनी जगभरात धुमाकूळ घातला. Krypytonite या गाण्यामुळे त्यांना ग्रॅमी नामांकन देखील मिळाले होते. विशेष म्हणजे, ब्रॅडने हे गाणं वयाच्या 15 व्या वर्षी, शाळेत गणिताचा तास सुरू असताना वर्गात कागदाच्या तुकड्यावर लिहिले होते. त्यांचा पहिला अल्बम 'द बेटर लाइफ'ने सर्व रेकॉर्ड मोडले. या अल्बमची 60 लाखहून अधिक कॉपी मार्केटमध्ये विकली गेली. त्यानंतर 2003 साली When I'm Gone या गाण्यासाठी दुसरा ग्रॅमी नॉमिनेशन मिळाला होता. रॉक संगीताच्या जगतात त्यांचे स्थान निर्माण झाले. गाण्यांमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रसिद्ध गायकाची कर्करोगाशी झुंज अपयशी, वयाच्या 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement