advertisement

Matheran News : माथेरानमध्ये पर्यटकांना सोसावे लागणार अतोनात हाल; नेमकं कारण काय?

Last Updated:

Matheran News : माथेरानला पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कारण आजपासून माथेरानवर एक पर्यटनासाठी असलेली सेवा बंद झालेली आहे.

Matheran e-rickshaw service latest update
Matheran e-rickshaw service latest update
माथेरान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक लोकप्रिय आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबईपासून सुमारे 80 किमी आणि पुण्यापासून 120 किमी अंतरावर असलेले माथेरान विकेंड ट्रिपसाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण मानले जाते. वर्षभर आल्हाददायक वातावरण तर पावसाळ्यात हिरवागार डोंगर, धबधबे आणि ट्रेकिंगचा अनुभव येथे मिळतो.
ई-रिक्षा बंद असण्याचे कारण काय?
दरम्यान माथेरानमधील ई-रिक्षा सुविधेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद राहणार आहेत. यामागे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी न होणं हे प्रमुख कारण आहे.
मुदत संपली तरी ई-रिक्षा अद्याप अपुऱ्या
माथेरानमध्ये आजही हातरिक्षा ओढणारे श्रमिक प्रवाशांची वाहतूक करतात. त्यांच्या कष्टांना पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टाने पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र सहा महिन्यांची मुदत उलटूनही 94 हातरिक्षांऐवजी पूर्ण क्षमतेने ई-रिक्षा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत.
advertisement
सध्या फक्त 20 हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा देण्यात आल्या आहेत. उर्वरित चालकांना अद्याप पर्याय न मिळाल्याने श्रमिक रिक्षा संघटनेने ई-रिक्षा आणि हातरिक्षा दोन्ही सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी हातरिक्षा ही अमानवीय प्रथा असल्याचे सांगत सहा महिन्यांत 94 हातरिक्षा बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आज 6 फेब्रुवारी रोजी ही मुदत संपली असतानाही या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Matheran News : माथेरानमध्ये पर्यटकांना सोसावे लागणार अतोनात हाल; नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement