भारतात Cervical Cancer वर उपचारासाठी किती येतो खर्च, पाकिस्तानमध्ये कितीला मिळते लस?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानात 68.6 दशलक्ष महिलांना सर्व्हायकल कॅन्सरचा धोका आहे.
मुंबई : जगभरात महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये हा प्रकार दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांत सर्व्हायकल कॅन्सरने अनेक महिलांचा बळी घेतला आहे. या प्रकारच्या कर्करोगाची आकडेवारी काय सांगते व त्यावरच्या औषधांची भारतात किंमत काय आहे?
जगभरात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या खालोखाल सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण आढळतं. या कॅन्सरबद्दल अजूनही महिलांमध्ये पुरेशी जागरूकता नाही. या कॅन्सरवरच्या उपचारांमध्ये खासगी व सार्वजनिक रुग्णालयातल्या खर्चात फार तफावत असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार, सर्व्हायकल कॅन्सरच्या 95 टक्के रुग्णांमध्ये ह्यूमन पेपिलोमा व्हायरस म्हणजेच एचपीव्ही हे कारण असतं. जगातल्या महिलांना होणारा हा कॅन्सरचा चौथा सामान्य प्रकार आहे. 2020मध्ये या कॅन्सरची 6,04,000 प्रकरणं उघडकीस आली होती, तर या कॅन्सरमुळे 3,42,000 महिलांचा मृत्यू झाला होता.
advertisement
भारत सरकारनं सर्व्हायकल कॅन्सरवरच्या लशीबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेतलाय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, की 9 ते 14 वर्षांच्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सरची लस मोफत दिली जाणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे, की ते सर्व्हायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी Cervavac नावाची लस तयार करणार आहेत. ही लस एचपीव्हीच्या 16, 18, 6 आणि 11 या प्रकारांपासून सुरक्षा मिळवून देऊ शकेल. सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी याआधी सांगितलं होतं, की या लसीची किंमत केवळ 200-400 रुपये प्रति डोस असेल. सध्या या कॅन्सरवरच्या बाजारात उपलब्ध असलेल्या लशींची किंमत 2500 ते 3300 रुपये प्रति डोस आहे.
advertisement
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानात 68.6 दशलक्ष महिलांना सर्व्हायकल कॅन्सरचा धोका आहे. केवळ 2023 मध्ये पाकिस्तानात 3 हजार महिलांना या कॅन्सरमुळे जीव गमवावा लागलाय. पाकिस्तानमध्येही त्यावरची प्रतिबंधक लस मिळते. GlaxoSmithKline च्या Cervarix Vaccine या लशीच्या एका डोसची किंमत 5 हजार पाकिस्तानी रुपये आहे.
मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयातल्या स्त्रीरोग आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉ. स्वाती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, की भारतात सर्व्हायकल कॅन्सरचं निदान बहुतेकदा प्रगत टप्प्यावर होतं. डॉ. स्वाती यांच्या मते, भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये हा कॅन्सर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ब्रेस्ट कॅन्सर आहे. वेगवेगळ्या रुग्णालयात या कॅन्सरच्या उपचारांचा खर्च वेगवेगळा असू शकतो. मोठ्या आणि खासगी रुग्णालयात यावरच्या उपचारांसाठी लाखो रुपये लागू शकतात, तर धर्मादाय किंवा सरकारी रुग्णालयात कमी खर्चात यावरचे उपचार होऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2024 10:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
भारतात Cervical Cancer वर उपचारासाठी किती येतो खर्च, पाकिस्तानमध्ये कितीला मिळते लस?







