एकदा खाल तर, गाजराचा हलवा खाणंच विसराल; चविष्ट रबडीसारखी दाटसर गाजराची खीर, रेसिपी Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गाजर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिवाळ्यात गाजर सहज उपलब्ध होतं आणि त्यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. त्यापैकी आज आपण गाजरापासून बनणारा एक गोड पदार्थ पाहणार आहोत.
पुणे प्रतिनिधी- पूजा सत्यवान पाटील
पुणे: गाजर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिवाळ्यात गाजर सहज उपलब्ध होतं आणि त्यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. त्यापैकी आज आपण गाजरापासून बनणारा एक गोड पदार्थ पाहणार आहोत. घरच्या साहित्यात तयार होणारी, रबडीसारखी चव असलेली गाजराची खीर .. वसुंधरा पाटुकले यांनी ही खीर बनवून दाखवली आहे. गाजर, तूप, दूध, साखर, वेलची पावडर, तांदूळ, काजू, ड्रायफ्रूट असं गाजराच्या खिरीसाठी लागणारं साहित्य आहे.
advertisement
कृती: सुरुवातीला गाजर नीट धुवून सोलून घ्या आणि मोठ्या किसणीवर किसून ठेवा. नंतर 2 टेबलस्पून तांदूळ धुवून साधारण 15–20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. भिजलेले तांदूळ आणि काजू मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. आता पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात काजू, बदाम, मनुका असे ड्रायफ्रूट्स हलकेसे फ्राय करून बाजूला काढा. त्याच पॅनमध्ये किसलेले गाजर घालून मध्यम आचेवर साधारण 10 मिनिटे परता.
advertisement
गाजर मऊ झाले की त्यात अर्धा लिटर दूध घाला आणि उकळी येऊ द्या.दूध उकळल्यानंतर त्यात काजू-तांदळाचे मिश्रण घाला आणि सतत हलवा. त्यानंतर आवडीनुसार साखर घाला. साखर विरघळल्यानंतर फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आणि थोडी वेलची पावडर घाला. ही खीर मंद आचेवर 15–20 मिनिटे शिजवा. खीर घट्ट झाली की गॅस बंद करा. रबडीसारखी चव असलेली गाजराची खीर तयार आहे. सध्या बाजारामध्ये गाजराचा सीझन सुरू आहे, त्यामुळे तुम्ही झटपचट बनवू शकता.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 3:52 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
एकदा खाल तर, गाजराचा हलवा खाणंच विसराल; चविष्ट रबडीसारखी दाटसर गाजराची खीर, रेसिपी Video










