Diwali Recipe : दिवाळीला बनवा खास कुरकुरीत खारी शंकरपाळी, असे टिकतील जास्त दिवस, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

दिवाळी जवळ आली की घराघरात फराळाचे तयारीचं उत्साहाचं वातावरण असतं. लाडू, चिवडा, करंजी यांच्या रांगेत एक खास आणि पारंपरिक पदार्थ खाऱ्या शंकरपाळ्या असतो.

+
दिवाळीच्या

दिवाळीच्या निमित्ताने खास कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या रेसिपी

मुंबई : दिवाळी जवळ आली की घराघरात फराळाचे तयारीचं उत्साहाचं वातावरण असतं. लाडू, चिवडा, करंजी यांच्या रांगेत एक खास आणि पारंपरिक पदार्थ खाऱ्या शंकरपाळ्या असतो. चहा सोबत अप्रतिम लागणाऱ्या आणि संपूर्ण कुटुंबाला आवडणाऱ्या या कुरकुरीत शंकरपाळ्या. गोडाच्या गर्दीत थोडा खारट स्वाद हवा असेल तर या खाऱ्या शंकरपाळ्या अगदी योग्य निवड आहे. पटकन होणारी, जास्त साहित्य न लागणारी आणि एकदा तयार केली की दिवसांचे दिवस टिकणारी ही डिश. तर चला तिची रेसिपी पाहुया.
खाऱ्या शंकरपाळ्यांची परिपूर्ण रेसिपी
साहित्य (4 ते 5 जणांसाठी):
मैदा – 2 कप
advertisement
रवा (सूजी) – 2 टेबलस्पून (कुरकुरीतपणासाठी)
ओवा – 1 टीस्पून
तिखट – 1/2 टीस्पून (ऐच्छिक, हलकं चवीनुसार)
advertisement
मीठ – चवीनुसार
मोहनासाठी तेल – 2 टेबलस्पून
पाणी – पीठ मळण्यासाठी
advertisement
तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार
खाऱ्या शंकरपाळ्यांची कृती:
advertisement
एका मोठ्या परातीत मैदा, रवा, ओवा, तिखट, हिंग आणि मीठ एकत्र करून नीट मिसळा.
त्यात गरम मोहन (तेल) घालून हाताने मिक्स करा. मिश्रण थोडं कुरकुरीत लागतंय का, हे बघा. यावर कुरकुरीतपणा अवलंबून आहे.
advertisement
मग थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्या (पूर्ण सैल नाही, पुऱ्यांच्या पीठासारखा).
गोळा झाकून साधारण 30 मिनिटं विश्रांतीस ठेवा.
advertisement
त्यानंतर पीठाच्या लहान लहान गोळ्या करून पोळीसारखं लाटून घ्या. फार पातळ नाही आणि फार जाड नाही.
त्यावर सुरीने किंवा कटरने चौकोनी तुकडे करा.
कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
काढून थंड करा आणि एअरटाईट डब्यात भरून ठेवा.
टीप:
ओवा आणि हिंग यामुळे ही शंकरपाळी चविष्ट तर होतेच, शिवाय पचायलाही हलकी पडते.
रवा वापरल्याने शंकरपाळ्या जास्त कुरकुरीत होतात.
एकदा गार झाल्यावरच डब्यात भराव्यात, नाहीतर ओलसरपणा येऊ शकतो.
जिथे सर्वत्र गोडधोड असते, तिथे खाऱ्या शंकरपाळ्यांसारखा तोंडाला विरस न आणणारा आणि चवीलाही झणझणीत वाटणारा पदार्थ हवाच. दिवाळीच्या फराळाच्या ताटाला एक खमंग, कुरकुरीत वळण देण्यासाठी ही शंकरपाळी नक्की करून बघा.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Diwali Recipe : दिवाळीला बनवा खास कुरकुरीत खारी शंकरपाळी, असे टिकतील जास्त दिवस, रेसिपीचा संपूर्ण Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement