Diwali Recipe : दिवाळीला पाक न वापरता रवा लाडू कसे बनवायचे? यापद्धतीने नाही होणार खराब, संपूर्ण रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अनेकदा लाडूसाठी पाक बनवताना त्यात चुका होतात आणि लाडू फसतात. तर मग याला ऑप्शन काय? अशावेळी तुम्ही पाक न वापरता लाडू बनवू शकता.
अमरावती : दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी लाडूचा मान असतो. त्यामुळे महिला आवर्जून लाडू बनवतात. पण, अनेकदा लाडूसाठी पाक बनवताना त्यात चुका होतात आणि लाडू फसतात. तर मग याला ऑप्शन काय? अशावेळी तुम्ही पाक न वापरता लाडू बनवू शकता. अगदी झटपट तयार होतात. ना पाक बनवण्याचं टेन्शन ना लाडू फसण्याचं. पाक न वापरता लाडू कसे बनवायचे? चला तर जाणून घेऊ.
पाक न वापरता रवा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दीड ग्लास रवा, पाऊण ग्लास साखर, अर्धी वाटी तूप, 4 ते 5 वेलची, बेदाणे हे साहित्य लागेल.
लाडू बनवण्याची कृती
हे लाडू बनवण्यासाठी बारीक रवा लागतो. जाड रवा वापरल्यास हे लाडू बनवण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. साखर बारीक करून घ्यायची आहे. त्याचबरोबर वेलची सुद्धा बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर रवा भाजून घ्या. सर्वात आधी रवा कढईत 3 ते 4 मिनिट परतवून घ्यायचा आहे. परतवून घेतल्यानंतर त्यात अर्धे तूप टाकून घ्यायचे आहे. रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून घेण्यासाठी 20 मिनिटे लागतात. आता पुन्हा यात तूप टाकून घ्या आणि रवा भाजून घ्या. 20 मिनिटांनंतर रवा छान भाजून झालेला असेल.
advertisement
त्यानंतर त्यात वेलची पूड आणि साखर टाकून घ्यायची आहे. साखर रव्यामध्ये अगदी झटपट मिक्स करायची आहे. या प्रोसेसला वेळ लागता कामा नये. अगदी 2 ते 3 मिनिटात रवा आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि मिश्रण प्लेन करून अर्धा तास झाकून ठेवायचं आहे.
advertisement
अर्धा तासानंतर हे मिश्रण मिक्सरमधून काढायचं आहे. या मिश्रणमध्ये दुधाचा फुलवा देऊन सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता. पण, मिक्सरमधून काढल्यानंतर याचे सहज लाडू तयार होतील. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही लाडू बनवू शकता. यात पाक नसल्याने हे लाडू सहज 1 महिना टिकतात.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
October 17, 2025 4:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Diwali Recipe : दिवाळीला पाक न वापरता रवा लाडू कसे बनवायचे? यापद्धतीने नाही होणार खराब, संपूर्ण रेसिपीचा Video