तोंडाची चव वाढवणारी सुंठ Weight Loss साठीही उपयुक्त; तज्ज्ञांनी सांगितली योग्य मात्रा
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
सुंठ म्हणजे कोरड्या आल्याची पूड ही स्वादवर्धक आहेच. पण आरोग्यासाठीही फायदेशी आहे. लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त आहे, असं तज्ज्ञ सांगतात. कधी घ्यायची, किती मात्रा घ्यायची वाचा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला
अनंंत कुमार
पाटणा: आले हे केवळ स्वयंपाकापुरते मर्यादित नाही, तर औषधी म्हणूनही आयुर्वेदात महत्त्वाचे आहे. त्याचं वाळलेलं रूप, म्हणजेच सुंठ, आरोग्यासाठी प्रभावी औषध मानलं जातं. सर्दी, पचनाच्या समस्या आणि लठ्ठपणापर्यंत, सुंठीचे अनेक फायदे आहेत. आज आपण या लेखात सुंठ सेवनाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेणार आहोत.
सुंठ ही सर्दी, खोकला, घसा खवखवणे, पचन समस्या, गॅस आणि लठ्ठपणा यांसाठी उपयुक्त आहे. याच्या वापरामुळे या तक्रारींवर मोठा आराम मिळतो. सुंठीचा प्रभाव उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात त्याचा अतिवापर टाळावा. मात्र, हिवाळ्यात याचे सेवन अधिक फायदेशीर ठरते. सुंठीमध्ये लोह, फायबर, सोडियम, फोलेट अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, झिंक आणि फॅटी अॅसिड यांसारखे महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात, जे शरीरासाठी उपयुक्त असतात.
advertisement
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. पंकज कुमार यांनी लोकल 18 ला सांगितले की, सुंठ बनवण्यासाठी आले चांगलं सोलून, वाळवलं जातं आणि नंतर ते दूध किंवा पाण्यात उकळून सेवनासाठी तयार केलं जातं. या पद्धतीमुळे सुंठीचे गुणधर्म कायम राहतात.
सुंठ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट सक्रिय करून पचन प्रक्रिया सुधारते. याच्या सेवनाने भूक वाढते आणि अन्न पचन चांगलं होतं. नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते, ज्यामुळे आपल्याला निरोगी आणि ताजेतवाने वाटतं. आयुर्वेदात, सुंठीचा वापर मूळव्याध, यकृत शुद्धीकरण, आणि भूक न लागणे यासारख्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
advertisement
Disclaimer: या बातमीत दिलेला औषध आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ज्ञांशी झालेल्या संभाषणावर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती असून वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतंही औषध किंवा उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Location :
Patna,Bihar
First Published :
September 16, 2024 3:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तोंडाची चव वाढवणारी सुंठ Weight Loss साठीही उपयुक्त; तज्ज्ञांनी सांगितली योग्य मात्रा